जन्मताच होती त्याची कोरोनाशी लढाई, 11 दिवसांनी नवजात बाळानं COVID-19 वर केली मात

जन्मताच होती त्याची कोरोनाशी लढाई, 11 दिवसांनी नवजात बाळानं COVID-19 वर केली मात

फक्त 11 दिवसांत एका बाळाने कोरोनाविरुद्धची (Fight Against Corona) लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. ते बाळ जन्मतःच कोरोना पॉझिटिव्ह होतं. 11 दिवसांत त्याने कोरोनाला हरवलं आहे.

  • Share this:

सौरभ गृहस्थी, जयपूर, 11 मे: कोरोनाच्या भयानक अशा दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) रुग्णांची झुंज सुरू आहे. यामध्ये काही जण त्यात जिंकतात, तर काही जण दुर्दैवाने हरतात. मात्र या दरम्यान काही बातम्या सुखावणाऱ्याही आहेत. तशीच एक घटना राजस्थानच्या (Rajasthan) राजधानीचं शहर असलेल्या जयपुरात (Jaipur) घडली आहे. तिथे फक्त 11 दिवसांत एका बाळाने कोरोनाविरुद्धची (Fight Against Corona) लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. ते बाळ जन्मतःच कोरोना पॉझिटिव्ह होतं. 11 दिवसांत त्याने कोरोनाला हरवलं आहे. मात्र थोडी चिंतेची बाब अशी की या बाळाची आई मात्र अद्याप व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहे. डॉक्टर्स तिच्यावर उपचार करत आहेत.

जयपूरच्या इटर्नल हॉस्पिटलमध्ये (Eternal Hospital) ही घटना घडली आहे. त्याठिकाणी 28 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे त्यांना बायपॅपवर (BiPAP) नेण्यात आलं. ते लावूनच त्यांची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याला जन्मतःच श्वास घ्यायला त्रास होत होता; म्हणून त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती इटर्नल हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक विभागाचे संचालक आणि अध्यक्ष डॉ. एस. डी. शर्मा यांनी दिली. त्या बाळाने कोरोनाला हरवल्यामुळे त्याला 'अजय' असं संबोधण्यात येत आहे.

हे वाचा-मदतीसाठी मन मोठं असावं लागतं; सर्वसामान्य आचारी 250 कोविड रुग्णांना पाठवतोय जेवण

बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या वॉर्डमधल्या (Neonatal Ward) अन्य सर्व बाळांना दुसरीकडे हलवण्यात आलं आणि फक्त याच बाळाला तिथे ठेवण्यात आलं. त्याची देखभाल करणाऱ्या नर्सेस आणि उपचार करणारे डॉक्टर्स पीपीई किट (PPE Kit) परिधान करून त्याच्याकडे जात होते. त्या बाळाला सीपॅप ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. हृदयात काही समस्या नाहीना हे तपासण्यासाठी त्याची टू-डी इको तपासणीही करण्यात आली. त्यात बाळाचं पल्मोनरी आर्टरी प्रेशर वाढलेलं असल्याचं कळलं. त्यामुळे बाळाला बऱ्याच काळापर्यंत ऑक्सिजनची गरज लागली. सहा दिवसांनंतर बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरीही त्याला ऑक्सिजनची गरज होती. हळूहळू त्याची तब्येत सुधारत गेली आणि नवव्या दिवशी ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला, असं डॉ. एस.डी. शर्मा यांनी सांगितलं.

हे वाचा-घरमालकानं घरात येऊ दिलं नाही, कोरोना Positive महिलेसह टॅक्सीत राहिलं कुटुंब

सोमवारी 10मे  रोजी अकराव्या दिवशी हे बाळ कृत्रिम ऑक्सिजनशिवाय आणि कोणत्याही अडचणीशिवाय दूध पिऊ लागलं. ते पचवूही लागलं आहे. त्यामुळे त्या बाळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बाळाचे बाबा त्याची देखभाल करत आहेत. डॉ. स्वतंत्र राठोड, डॉ. आवेश सैनी, डॉ. सुरेंद्र व्यास यांच्यासह प्रिन्सी, पवन, मंजू, विनोद आणि चंद्रशेखर या नर्सिंग स्टाफने या बाळाची देखभाल आणि उपचारांची व्यवस्था पाहिली.

First published: May 11, 2021, 12:38 PM IST

ताज्या बातम्या