मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; VIDEO पाहताच म्हणाल, लय भारी!

महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; VIDEO पाहताच म्हणाल, लय भारी!

जे आरामदायी कपड्यांमध्येही शक्य नाही ते या महिलेनं साडीत (Stunt in saree) करून दाखवलं आहे.

जे आरामदायी कपड्यांमध्येही शक्य नाही ते या महिलेनं साडीत (Stunt in saree) करून दाखवलं आहे.

जे आरामदायी कपड्यांमध्येही शक्य नाही ते या महिलेनं साडीत (Stunt in saree) करून दाखवलं आहे.

मुंबई, 12 एप्रिल : कित्येकांना साडी (Saree) नेसून नीट चालणंही शक्य होत नाही. साडी सावरता सावरताच नाकी नऊ येतात. उठणं-बसणंही कठीण वाटतं. अशी साडी नेसून स्टंट (Stunt in saree) मारणं तर मग दूरचीच गोष्ट. किंबहुना अनेकांना तर ते शक्यच नाही असंच वाटेल. पण ही अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली आहे ती एका डान्सरने. डान्सर रुक्मिणी विजयकुमार (Dancer Rukmini Vijayakumar) यांनी साडी नेसून असे खतरनाक स्टंट केले आहेत की तुम्ही पाहतच राहाल.

डान्सर रुक्मिणी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये त्या साडीवर स्टंट करताना दिसत आहेत. त्यांनी साडीवर असे स्टंट केले आहेत. जे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

व्हिडीओत पाहू शकता रुक्मिणी साडीवर स्पिलट्स आणि बॅकफ्लिप करताना दिसत आहेत. अगदी जीम किंवा योगासाठी आपण जे कपडे घालतो त्यावरसुद्धा असे स्टंट करणं म्हणजे कठीण. मग तर साडीवर असे स्टंट करणं म्हणजे एक आव्हानच. पण रुक्मिणी यांनी किती सहजपणे हे स्टंट केले आहेत ते पाहू शकता.

हे वाचा - VIDEO कोरोना लशीचा मिळाला दुसरा डोस;गोठलेल्या तलावात भांगडा करत व्यक्त केला आनंद

रुक्मिणी यांनी गेल्यावर्षी वर्ल्ड योगा डेच्या दिवशी आपल्या साडीवरील स्टंट्सचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याच व्हिडीओमागील हे सीन्स आहेत, असं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Stunt video, Viral, Viral videos