Home /News /viral /

73 वर्षीय या आजीबाईंना करायचं आहे लग्न, जोडीदाराच्या शोधात दिलेली खास जाहिरात VIRAL

73 वर्षीय या आजीबाईंना करायचं आहे लग्न, जोडीदाराच्या शोधात दिलेली खास जाहिरात VIRAL

लग्नासाठी जाहिरात देणं यात काही नवल नाही, मात्र ही बातमी खास ठरते या महिलेच्या वयामुळे. मॅट्रीमोनिअल साईटच्या (Matrimonial Adv) माध्यमातून लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या या महिलेचं वय 73 वर्ष आहे.

    बंगळुरु 10 एप्रिल : लग्नासाठी एका महिलेनं दिलेली एक जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना आहे कर्नाटकच्या (Karnataka) मैसूरमधील. लग्नासाठी जाहिरात देणं यात काही नवल नाही, मात्र ही बातमी खास ठरते या महिलेच्या वयामुळे. मॅट्रीमोनिअल साईटच्या (Matrimonial site) माध्यमातून लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या या महिलेचं वय 73 वर्ष आहे. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त असलेल्या या महिलेच्या निर्णयाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. लोकांचं म्हणणं आहे, की वयाच्या या टप्प्यात पुन्हा संसार उभा करण्याची इच्छा ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, जाहिरातीमध्ये महिलेनं म्हटलं आहे, की त्या 73 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. मी एका ब्राह्मण नवरदेवाचा शोध घेत आहे, जो माझ्यापेक्षा मोठा असेल. मला माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी एका जोडीदाराची गरज आहे. वृत्तपत्रात छापलेली ही जाहिरात सोशल मीडियावर (Viral on Social Media) सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी महिलेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी फसवणुकीपासून वाचण्याचा सल्ला. वयाच्या या टप्प्यात महिलेच्या आयुष्यात खूप एकटेपण आहे. त्यांनी सांगितलं, की त्यांच्या कुटुंबात आता कोणीच नाही. नवऱ्यासोबत त्यांचा खूप आधीच घटस्फोट झाला आहे आणि आई वडीलांच्या निधनानंरतर त्या पूर्णपणे एकट्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,त्यांना एकटीला भीती वाटते, म्हणूनच आता त्या जोडीदाराचा शोध घेत आहेत. जेणेकरुन उरलेलं आयुष्य एखाद्या खास व्यक्तीसोबत घालवता यावं. महिलेनं सांगितलं, की त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत वाईट होतं. त्यामुळे, त्यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यात त्यांना एका जोडीदाराची गरज आहे. ज्याच्यासोबत त्या आपलं सुख, दुःख वाटू शकेल. ज्याच्यासोबत त्या आपला एकटेपणा दूर करण्यासाठी बातचीत करतील. महिलेच्या या निर्णयाचं तरुणाईकडून भरभरुन कौतुक होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 73 व्या वर्षी लग्नाची इच्छा व्यक्त करत या महिलेनं परंपरा आणि प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर, सामजिक कार्यकर्त्या रूपा हसन यांचं असं म्हणणं आहे, की महिलेनं अत्यंत सावधपणे पाऊल उचलायला हवं. कारण, गुन्हेगार त्यांच्या भावनांसोबत खेळ करुन त्यांना इजाही पोहोचवू शकतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Viral, Wedding

    पुढील बातम्या