मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mucormycosis : कोरोनामुळे होतंय आणखी एक भयंकर इन्फेक्शन; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे

Mucormycosis : कोरोनामुळे होतंय आणखी एक भयंकर इन्फेक्शन; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे

कोरोना रुग्णांना म्युकोरमाइसिस (Mucormycosis) झाल्याची 15 दिवसांत 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांनी आपले डोळे गमावले आहेत.

कोरोना रुग्णांना म्युकोरमाइसिस (Mucormycosis) झाल्याची 15 दिवसांत 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांनी आपले डोळे गमावले आहेत.

कोरोना रुग्णांना म्युकोरमाइसिस (Mucormycosis) झाल्याची 15 दिवसांत 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांनी आपले डोळे गमावले आहेत.

सूरत, 07 मे: कोरोनाशी (Coronavirus) झुंज देता देता आता कोरोनामुळे आणखी एका इन्फेक्शनचं (Infection) संकट आलं आहे. कोरोना रुग्णांना आता म्युकोरमाइसिस (Mucormycosis) हे गंभीर असं इन्फेक्शन होतं आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये तब्बल 8 रुग्णांचे डोळे (Corona patient eye removed) काढण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये म्युकोरमाइसिस हे जीवघेणं फंगल इन्फेक्शन होत असल्याचं दिसतं आहे. डॉक्टरांच्या मते, कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशी काही प्रकरणं नव्हती. पण दुसऱ्या लाटेत या इन्फेक्शनचे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या डोळ्यात वेदना आणि सौम्य डोकेदुखी जाणवत होती पण आता ही समस्या अधिक दिसून येते आहे. सूरतमध्ये 15 दिवसांत अशी 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांचे डोळे काढावे लागले.

हे वाचा - Smell आणि Taste जाणं चांगलं लक्षण; कोरोना रुग्णांसाठी पॉझिटिव्ह बातमी

सर गंगाराम रुग्णालयातील नाक-कान-घसा सर्जन डॉक्टर मनीष मुंजाल यांनी सांगितलं, कोविड-19 मुळे होणाऱ्या या भयंकर फंगल इन्फेक्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. गेल्या दोन दिवसांत आम्ही म्युकोरमाइसिसच्या सहा रुग्णांना भरती केलं आहे.

म्युकोरमायकोसिसची लक्षणं

तीव्र डोकेदुखी

अंगात सतत बारीक ताप असणं

गालावर सूज किंवा बधिरपणा येणं

नाक गळणं

जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणं

हे वाचा - हा घातक आजार पुन्हा डोकं वर काढतोय, कोरोनातून बरं झालेल्यांना होतोय संसर्ग

वरच्या जबड्यातील दातांचं हलणं

जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणं.

वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणं.

आजार टाळण्याचे उपाय

तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणानं धुणं

मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणं.

रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणं.

लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि उपचार करणं.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Eyes damage