Home /News /lifestyle /

Smell आणि Taste जाणं चांगलं लक्षण; कोरोना रुग्णांसाठी पॉझिटिव्ह बातमी

Smell आणि Taste जाणं चांगलं लक्षण; कोरोना रुग्णांसाठी पॉझिटिव्ह बातमी

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

पत्नीची काळजी घेणाऱ्या पतींसाठी टीप्स

कोरोना संसर्ग होताच चव आणि वास घेण्याची क्षमता (Lost of smell and taste) गेली असेल तर हे तुमच्यासाठी चांगले संकेत आहेत.

    मुंबई, 07 मे : ताप, खोकला याशिवाय कोरोनाची दुसरी लक्षणं (Coronavirus symptoms) म्हणजे वास (Smell) आणि चव (Taste) जाणं. कोरोना संसर्ग होताच चव आणि वास घेण्याची क्षमता (Lost of smell and taste) जाते. सर्वच कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण (Symptoms of Coronavirus)  असेलच असं नाही. पण ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. तुमच्यामध्येही कोरोनाची अशी लक्षणं असतील तर घाबरू नका. खरंतर तशी ही लक्षणं चांगली आहेत. चव न लागणं आणि वास न येणं असं लक्षण असणं म्हणजे तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कोरोना नाही. तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत नाही. डॉ. अमोल अन्नदाते यांनी आपल्या युट्यूब चॅनेलमधून ही माहिती दिली आहे. डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले, "ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं असतात ते फार गंभीर नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज फार भासत नाही. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी फार कमी होत नाही आणि त्यांच्या फुफ्फुसांवर या आजाराचा परिणाम कमी होतो. त्यामुळे कोरोना संक्रमित असाल आणि अशी लक्षणं असेल तर खरंतर तुमच्यासाठी हा दिलासा आहे" हे वाचा - भारतातील कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार? रशियाच्या Sputnik Light मुळे आशेचा किरण "पण याचा अर्थ असा नाही ही तुम्ही दुर्लक्ष करायला हवा. ऑक्सिजनची पातळी सातत्याने तपासत राहायला हवी", असा सल्लाही डॉ. अन्नदाते यांनी दिला आहे. कोरोनामुळे वास आणि चवीच्या क्षमतेवर का होतो परिणाम कोरोनामुळे  वास आणि चव घेण्याची क्षमता गेली तर काय परिणाम होतो याबाबत गेल्या दीड वर्षांत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या संशोधनातून अनेक निष्कर्ष समोर आले आहेत. एका अभ्यासानुसार कोरोनाचे विषाणू वास आणि चव ज्यामुळे येते, त्या नर्व्हस सिस्टीमवर (NervousSystem) हल्ला करतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा - Homeopathic औषध Drosera 30 जीवघेणं ठरू शकतं? काय म्हणाले डॉक्टर पाहा तर आणखी एका अभ्यासानुसार आपल्या शरीरात पेशी असतात त्यांना होस्ट सेल (Host Cell) असं म्हणतात. त्यातACE2 हे प्रोटीन असतं. हे प्रोटीन प्रामुख्याने नाक आणि तोंडात मोठ्या प्रमाणावर असतं. जेव्हा कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात, त्यावेळी हे विषाणू यावर हल्ला करतात. त्यामुळे रुग्णाची चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. कोरोनामुळे गेलेली वास आणि चव घेण्याची क्षमता परत कशी मिळवता येते? वास आणि चव घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यावर ही क्षमता परत येईल का नाही अशी भीती लोकांमध्ये असते. संशोधक याबाबत लोकांना आश्वस्त करीत स्मेल अँड टेस्ट्र ट्रेनिंग (Smell and Test Training) घेण्याचा सल्ला देतात. कोरोनावर उपचार सुरू होताच आणि रुग्ण बरा होण्याकडे वाटचाल करू लागल्यानंतर मेंदू सक्रिय व्हावा यासाठी रुग्णाला स्वयंपाकघरातील मसाले, हिंग, संत्री यांसारख्या तीव्र गंधयुक्त पदार्थांचा वास डोळ्यांवर पट्टी बांधून घ्यायला सांगितला जातो. रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर या दोन्ही गोष्टी पुन्हा सुरळीत होतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या