Home /News /lifestyle /

तरुण नाहीच पण भयानक दिसू लागली; 2 लाख रुपयांची क्रीम लावल्यानंतर महिलेच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था

तरुण नाहीच पण भयानक दिसू लागली; 2 लाख रुपयांची क्रीम लावल्यानंतर महिलेच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था

सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावरील त्वचा बटाट्याच्या सालीसारखी सोलून निघाली.

ब्रिटन, 13 जुलै : जगातल्या प्रत्येक महिलेला वाटतं, की आपण सर्वांत सुंदर (Beauty) दिसावं. अगदी वाढत्या वयातही आपल्या चेहरा अगदी तरुण, तजेलदार, उजळ राहावा असंच वाटतं. यासाठी काही जण घरगुती उपचार करतात, काही जण महागडे कॉस्मेटिक्स वापरतात तर काही जण कॉस्मेटिक सर्जरीही (Cosmetic Surgery) करतात. पण याचा बहुतेक वेळा उलट परिणामही (Side effect of beauty treatment) दिसून येतो. सुंदर, तरुण दिसणं तर दूर चेहऱ्याची अक्षरशः वाटच लागते. अशीच आपल्या चेहऱ्याची वाट लावली आहे ती ब्रिटनमधील एका महिलेनं. 51 वर्षीय महिलेनं तरुण दिसण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची क्रीम लावली (2 lakh rupees beauty cream). पण त्यानंतर तिच्या चेहऱ्याची अवस्था इतकी भयानक झाली आहे की तिने विचारही केला नसले. या महिलेने आपला अनुभव टिकटॉकवर (TikTok) शेअर केला आहे. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या काढून टाकण्यासाठी दोन लाखांचं क्रीम लावलं होतं; मात्र हे क्रीम लावल्यानंतर तिच्या चेहऱ्याची त्वचा उकडलेल्या बटाट्याच्या सालीसारखी निघू लागली. 51 वर्षांच्या अमांडा वॅटकिन्स (Amanda Watkins) सौंदर्य उत्पादनांच्या चाहत्या आहेत. स्वत:ला कायम तरुण ठेवण्यासाठी अमांडा अनेक प्रकारचे उपचार घेत असतात. अलीकडेच त्यांनी चेहऱ्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले; पण याचा फायदा न होता त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्याचे एवढे भयानक परिणाम होतील याचा त्यांना अजिबात अंदाज नव्हता. क्रीमचा वापर केल्यानंतर त्यांची त्वचा सोलून निघाली. त्यामुळे संपूर्ण चेहरा खराब झाला. अमांडाने या दुर्दैवी घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे वाचा - घरबसल्या करा अशी Nail test; नखांवरूनच ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे अमांडा यांनी दोन लाख रुपये खर्च करून पील स्किन ट्रीटमेंट (peel skin treatment) घेतली होती. यामुळे सुरकुत्या आणि फ्रीकल्स कमी होणार होते. तजेलदार त्वचा मिळण्याच्या हेतूने त्यांनी ही ट्रीटमेंट घेतली; मात्र त्यांची त्वचा यामुळे अधिकच खराब झाली. अमांडा यांच्या डोळ्यांच्या खालील त्वचा निघून जाऊ लागली. अमांडा यांनी सांगितलं, की त्यांची त्वचा बटाट्याच्या सालीसारखी निघून जाऊ लागली. त्वचा निघून गेल्यावर संपूर्ण चेहरा लाल झाला होता. अमांडा यांनी तरूण दिसण्यासाठी ही असह्य ट्रीटमेंट घेतली; पण याचा परिणाम असा होईल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे वाचा - प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह! Appendix चं ऑपरेशन करायला गेली; पोटातून निघालं बाळ 26 मे रोजी अमांडा यांनी ही ट्रीटमेंट घेतली. यानंतर चेहऱ्यावर जळजळ होऊ लागली. यासाठी त्यांना चेहऱ्यावर बर्फ लावावा लागला; मात्र ट्रीटमेंट घेऊन बरेच दिवस उलटल्यानंतर आता अमांडा खूप खूश आहेत. ट्रीटमेंटमुळे सर्व सुरकुत्या निघून गेल्या आहेत. आता त्यांची त्वचा एखाद्या तरुण मुलीसारखी दिसू लागली आहे,  असा दावा तिने केला आहे.  परंतु अमांडाने अशी ट्रीटमेंट घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.
First published:

Tags: Beauty tips, Health, Lifestyle

पुढील बातम्या