• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • घरबसल्या करा अशी Nail test; नखांवरूनच ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे

घरबसल्या करा अशी Nail test; नखांवरूनच ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे

तुमच्या नखांमध्ये तुमचं आरोग्य दडलं आहे.

  • Share this:
मुंबई, 13 जुलै :  बहुतेक महिला नखांची (Nail) विशेष काळजी घेतात. त्यांची योग्य ती ट्रिटमेंट (Nail treatment) करतात. नखांचा आकार (Nail size) कसा असावा, नखांना कोणता नेल कलरअसावा याकडे त्या प्रामुख्याने लक्ष देतात. नखं हा महिलांच्या सौंदर्याचा एक भाग. पण तुम्हाला माहिती आहे का, नखं हा फक्त सौंदर्याचा भाग नाही तर आपल्या आरोग्याचाही (Nail health) भाग आहे. नखांमध्ये आपलं आरोग्य दडलेलं आहे. नखांचा बदलेला रंग आणि आकार यावरून त्या व्यक्तीचं आरोग्य नीट नसल्याचं लक्षात येतं. आपल्याला माहीत नसलेल्या आजाराशी आपण सामना करत आहोत, असं यावरून समजून घ्यायचं. नखांवर लक्ष ठेवून आपण कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार टाळू शकतो. नखं आपल्या आरोग्याबद्दल कशी माहिती देतात, ते जाणून घेऊया. तुटलेली नखं ठिसूळ नखं किंवा वारंवार नखं तुटणं यावरून आपल्याला समजतं की आपली नखं कमकुवत झाली आहेत. नखांची ही स्थिती आपल्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्याचे संकेत देतात. नखं जर तिरक्या दिशेनं तुटत असतील, तेव्हा त्याला ओन्कोस्किझिया म्हणतात. नखं जर वाढ ज्या दिशेनं होते त्याचं दिशने तुटतं असतील तर त्याला ओन्कोरोहेक्सिस म्हणतात. नखं तुटणं म्हणजे शरीर कमकुवत होणं होय. हे वाचा - लो ब्रडप्रेशरनेही होतो जिवाला धोका;त्वरित आरामासाठी करा घरगुती उपचार फिकट नखं नखांचा रंग फिका पडणं हे वृद्धत्वाचं सामान्य लक्षण आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांची नखं फिकी पडतात. मात्र तरुण वयातील लोकांची नखं फिकी पडणं म्हणजे त्यांना कोणतातरी आजार आहे याचा संकेत देतात. शरीरात रक्ताची कमतरता, कुपोषण, यकृताचा आजार किंवा हृदयाशी संबंधित आजारांमुळे नखं फिकट पडतात. पांढरी नखं बोटांना दुखापत झाल्यामुळं बर्‍याच वेळा नखं पांढरी होतात. परंतु जर तुमची सर्व नखं हळूहळू पांढरी होतं असतील तर याचा अर्थ असा होतो की आपलं शरीर निरोगी नाही. अशी नखं असतील तर त्या व्यक्तीला यकृताचा आजार, मूत्रपिंडाचा गंभीर आजार आणि कंजेस्टिव हार्ट डिसीज (congestive heart disease) हे आजार झालेले असू शकतात. हे वाचा - थोडंसं काम केल्यावर येणारा थकवा सामान्य नव्हे; शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत पिवळी नखं बऱ्याचदा बुरशीजन्य संसर्गामुळे (Fungal Infection) नखं पिवळ्या रंगाची होतात. अशी नखं सोरायसिस (Psoriasis), थायरॉईड (Thyroid) आणि मधुमेह (Diabetic) या आजारांबद्दल आपल्याला संकेत देतात. यलो नेल सिंड्रोम (YNS) नावाचा एक दुर्मिळ आजार आहे. फुफ्फुसाचा त्रास असणाऱ्या किंवा हात-पायांना सूज येणाऱ्या लोकांमध्ये हा आजार आढळतो. तसंच शरीरात व्हिटॅमिन ई (Vitamin E) ची कमतरता असल्यामुळे देखील नखं पिवळी होतात. निळी नखं नखं निळी होण्याची अनेक कारणं असू शकतात. यालाचं ब्लू पिगमेंटेशन नेल्स (blue pigmentation nails) असं देखील म्हणतात. सहसा चांदीच्या जास्त संपर्कात राहिल्यामुळे देखील नखं निळी होतात. मलेरिया (Malaria), हृदयरोग (Heart Disease) आणि यकृताशी संबंधित आजार (Liver Disease) यांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे नखं निळी होतात. एचआयव्ही (HIV) रूग्णांची देखील नखं निळी होतात.
First published: