नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं. कानातलं मेण पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे तुमच्या बाह्य कान आणि कानाच्या पडद्याला अस्तर असलेल्या पेशींद्वारे तयार केलं जातं आणि हा एक नैसर्गिक तेलकट पदार्थ आहे. कानातलं मेण खरं तर विषाणू आणि हानिकारक जीवाणूंना तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत जाण्यापासून वाचवतं. पण काही लोक हे कानातलं मेण स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. कान स्वच्छ करण्यासाठी बड्सऐवजी दुसऱ्या काही इअर वॅक्स क्लिनींग ट्रिक्सचा वापर करू शकता असं तज्ज्ञांचं (Safe ear cleaning tricks) म्हणणं आहे. कसं ते जाणून घेऊ. तज्ज्ञ काय म्हणतात ‘झी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार, युनिव्हर्सिटी ऑफ लुईव्हिलमधील नाक, कान, घसा तज्ज्ञ (ENT specialist) जेरी लिन सांगतात की, काहीवेळा कानात दुखणं, जास्त खाज येणं किंवा इतर काही अस्वस्थतेमुळं तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. पण काही पद्धतींचा वापर करून तुम्ही कान स्वच्छ करू शकता. जेरी लिन म्हणाले की, कानाच्या वरवरच्या भागातलं थोडेसं मेण काढणं ठीक आहे. परंतु, कानाच्या जास्त आतमध्ये काडी घालणं धोकादायक ठरू शकतं. इयर ड्रॉप्स वापरा लिन म्हणाले की, इयर ड्रॉप्स वापरल्यानं कानातील मेण साफ होण्यास मदत होते. याच्यामुळं कानातलं मेण पातळ आणि मऊ होण्यास मदत होते. यामुळं ते कानातून बाहेर काढणं सोपं होतं. तुम्ही फार्मसी स्टोअर्समधून इयर ड्रॉप्स खरेदी करू शकता. ते सहसा ओटेक्स आणि ओटोसनसारख्या ब्रँडच्या नावानं येतात. कोणतंही औषध घेताना तुम्ही नेहमी लेबल वाचलं पाहिजे. कारण, तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की, कानात एका वेळेस किती ड्रॉप्स टाकणं योग्य आहे. हे वाचा - या नागरिकांसाठी सर्वात फायद्याची आहे RD, स्कीमच्या या प्रकारांमध्ये करता येईल गुंतवणूक बेकिंग सोडा द्रावण उपयुक्त ठरू शकतं लिन म्हणाले की बेकिंग सोडा सोल्यूशन वापरल्यानं कानातले मेण काढून टाकण्यास मदत होते. ते तयार करणं सोपं आहे. तुम्ही ही पद्धत फक्त दोन आठवडे वापरावी. तुम्हाला फक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून डिस्पेंसर किंवा ड्रॉपर बाटलीत ठेवावा लागेल. नंतर द्रावणाचे पाच ते दहा थेंब कानात टाकावेत. सुमारे एक तासानंतर मेण मऊ होण्यास सुरवात होईल. यानंतर तुम्ही कान स्वच्छ करून ते स्वच्छ, कोरड्या टॉवेलनं कोरडे केल्याची खात्री करा. तुम्ही हे दिवसा करू शकता. हे वाचा - Special News : रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक तेलाचा वापर उपयुक्त आहे तुम्ही तुमचे कान स्वच्छ करण्यासाठी तेलासारखे नैसर्गिक उपाय देखील वापरू शकता. तुम्ही बेबी ऑइल, मिनरल ऑइल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे सर्व कानातले मेण मऊ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे तुम्हाला कानात घालण्यासाठी पुन्हा ड्रॉपरची बाटली वापरावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.