मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Camphor Benefit: पूजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसात होतील गायब

Camphor Benefit: पूजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसात होतील गायब

कापरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा, हेही समजून घेणं आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 डिसेंबर : पूजेच्या वेळी कापूर (camphor) वापरला जातो. असं मानलं जातं की कापरामध्ये वास्तू दोष आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. या कारणास्तव कापूर अत्यंत पवित्र मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, कापरामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे तुमच्या सर्व शारीरिक समस्या दूर (camphor health benefit) करू शकतात.

'टीव्ही 9' ने दिलेल्या बातमीनुसार कापरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा, हेही समजून घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊ, कापरापासून कोणकोणते फायदे (camphor benefit) मिळतात, ज्याबद्दल आपण आतापर्यंत अनभिज्ञ आहोत.

तणाव दूर करतो

कापराचा सुगंध मनाला शांत करतो. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर, एका भांड्यात कापूर ठेवा आणि खोलीत ठेवा. यामुळं तणाव दूर होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. शिवाय, तुम्हाला रात्री चांगली झोपही लागेल.

डोकेदुखी दूर करतो

डोकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, शुंथी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थोडा वेळ तसंच पडून रहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल.

स्नायू वेदना आणि खोकल्यामध्ये आराम

स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कापूर देखील उपयुक्त मानला जातो. यासाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून नियमितपणे शरीराची मालिश करावी. खोकला झाल्यास या तेलानं छाती आणि पाठीला मालिश करा. तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल. तुम्ही मोहरीऐवजी तिळाचं तेलही वापरू शकता. शिवाय, सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यानं खूप आराम मिळतो.

हे वाचा - Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

जर तुमच्या त्वचेवर खूप डाग असतील तर खोबरेल तेलात कापूर मिसळून ते नियमितपणे त्वचेवर लावावं. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. पण जर त्वचा तेलकट असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर हे करा. खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांमध्ये लावल्याने कोंड्याची समस्या दूर होऊन केस काळे राहतात.

हे वाचा - Save the date : या रात्री आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य; पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका

फुटलेल्या टाचा बऱ्या करते

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशा स्थितीत कापूर तेलात पाणी मिसळा आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. यानंतर पाय पुसून क्रीम किंवा तेल लावा. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम मिळेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips