भारतात होणार नाही कोरोना लशीचा तुटवडा; Sputnik V चे महिन्याला 5 कोटी डोस

भारतात होणार नाही कोरोना लशीचा तुटवडा; Sputnik V चे महिन्याला 5 कोटी डोस

Sputnik V लशीचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे.

  • Share this:

 नवी दिल्ली, 15 एप्रिल : द ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) अर्थात भारतीय औषध महानियंत्रकांनी सोमवारी Sputnik V या रशियान लशीच्या भारतातल्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. रशियातल्या क्लिनिकल ट्रायल्सचे (Clinical Trials)निष्कर्ष तसंच डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या (Dr. Reddy's Laboratory) सहकार्याने भारतात घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये प्राप्त झालेली सकारात्मक माहिती यांच्या आधारे या लशीला मंजुरी देण्यात आली. द रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने (RDIF) मंगळवारी (13 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, भारतात या उन्हाळ्यातल्या दोन महिन्यांत रशियाच्या स्पुतनिक V (Sputnik V)या लशीच्या किमान पाच कोटी डोसेसची दर महिन्याला निर्मिती होणार आहे.

'आरडीआयएफ'चे सीईओ किरिल दिमित्रिएव्ह (Kiril Dmitriev) यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितलं, की आतापर्यंत रशियाने (Russia) भारतातल्या पाच कंपन्यांशी या लशीच्या निर्मितीसाठी करार केले आहेत. आणखीही काही कंपन्यांशी करार करण्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. स्पुतनिक V ही भारतीय-रशियन लस आहे असंच जणू आम्ही समजतो आहोत. कारण या लशीचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे.

हे वाचा - कोरोनाविरोधातील लढ्याबाबत मोठी बातमी; कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार

दर महिन्याला पाच कोटींहून अधिक डोसेसची निर्मिती भारतात उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत केली जाईल, असं किरिल यांनी साांगितलं. काही भारतीय कंपन्यांनी कडक क्वालिटी चेक्स पाळून लशींच्या उत्पादनाला सुरुवात केलीही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतात स्पुतनिक V या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासाठी आरडीआयएफने सप्टेंबर 2020 मध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीशी करार केला. भारतात या लशीचे 10 कोटी डोस वितरित करण्याचा करार पहिल्यांदा करण्यात आला होता. नंतर ही संख्या वाढवून साडेबारा कोटी डोस एवढी करण्यात आली.

हे वाचा - कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या Remdesivir बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

ग्लॅंड फार्मा, हेटेरो बायोफार्मा, स्टेलिस बायोफार्मा, व्हरचौ बायोटेक आणि पॅनाशिया बायोटेक या भारतातल्या फार्मा कंपन्यांशी RDIF ने उत्पादनाचे करार केले आहेत. स्पुतनिक V ही लस भारतात किती रुपयांना विकली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची किंमत 10डॉलर म्हणजे सुमारे 750 रुपये एवढी आहे. ही लस कोरोनावर 91.5 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. मॉडर्ना (Moderna)आणि फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या लशींनंतर सर्वाधिक प्रभावी लस म्हणून या लशीचा नंबर लागतो.

First published: April 15, 2021, 8:42 AM IST

ताज्या बातम्या