कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या Remdesivir बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या Remdesivir बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोरोना रुग्णांवरील उपचारात रेमडेसिवीर (Remdesivir) औषध प्रामुख्याने वापरलं जातं.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : गेले काही दिवस रेमडेसिवीर (Remdesivir) औषध बरेच चर्चेत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा तुटवडा जाणवतो आहे, हे औषध वाढीव दराने विकलं जात आहे, या औषधाचा काळाबाजार केला जात आहे. अशा बऱ्याच बातम्या कानावर येत आहेत. दरम्यान आता याच औषधाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

रेमडेसिवीर औषधाचं उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा तसंच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग  (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन आणि खते, मंत्री मनसुख मांडवीय यांनी 12 आणि 13 एप्रिल, 2021 रोजी रेमडेसिवीर औषधाचे सर्व उत्पादक आणि इतर हितधारकांबरोबर बैठक घेतली. या औषधाच्या उपलब्धतेच्या समस्येचा आढावा घेतला आणि मग हा निर्णय घेतला आहे.

रेमडेसिवीरच्या सात उत्पादकांची सध्याची स्थापित क्षमता दरमहा 38.80 लाख कुपी इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा 10 लाख कुपी  उत्पादन क्षमता असणार्‍या सात अतिरिक्त जागांसाठी  जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दर महिन्याला आणखी 30  लाख कुप्याचे  उत्पादन लवकरच सुरु होईल. यामुळे महिन्याला सुमारे 78 लाख कुप्यांपर्यंत  उत्पादन क्षमता वाढीस लागेल.

हे वाचा - कोरोनाचा उद्रेक, आयआयटी मुंबईतील 20 विद्यार्थ्याना कोरोना

अतिरिक्त उपाय म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत रेमडेसीवीरचा पुरवठा वाढवण्यासाठी 11.04.2021 रोजी डीजीएफटीद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर, निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या अंदाजे 4 लाख रेमडेसिवीर कुपींचा पुरवठा उत्पादकांकडून देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी वळवला जात आहे. ईओयू / सेझ युनिट्स देखील देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी सक्षम केली जात आहेत.

कोविड विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या  प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी स्वेच्छेने या आठवड्याच्या अखेरीस 3500 रुपयांहून कमी केली आहे. रुग्णालय / संस्था पातळीवरील पुरवठा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश रेमडेसिवीरच्या उत्पादनांना देण्यात आले आहेत.

हे वाचा - सरकारी रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीची चोरी, लस चोरीची देशातील पहिलीच घटना

औषध महानियंत्रकांनी राज्ये आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी प्राधिकरणांना रेमडेसिवीरचा काळा बाजार, साठवणूक आणि वाढीव दर आकारण्याच्या घटनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (एनपीपीए) रेमडीसीवीरच्या उपलब्धतेवर सातत्याने देखरेख ठेवत आहे.

Published by: Priya Lad
First published: April 14, 2021, 6:55 PM IST

ताज्या बातम्या