Home /News /lifestyle /

Organic Skincare किती फायदेशीर? जाणून त्याचे 5 गैरसमज!

Organic Skincare किती फायदेशीर? जाणून त्याचे 5 गैरसमज!

कमळ काकडी चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग किंवा मुरूमांची समस्या असेल तर, कमळ काकडीचा आहारामध्ये समावेश करावा. कमल काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं.

कमळ काकडी चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग किंवा मुरूमांची समस्या असेल तर, कमळ काकडीचा आहारामध्ये समावेश करावा. कमल काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं.

ऑरगॅनिक स्किनकेअरबाबत आणि त्यातील नॅचरल घटकांबाबत लोकांना खूप गैरसमज आहेत.

मुंबई, 27 फेब्रुवारी: गेल्या काही वर्षांपासून स्किनकेअर प्रॉडक्टचा (Skincare Products) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रॉडक्टबाबत ग्राहक खूपच जागरूक झाले आहेत. कारण बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोशन आणि फेस क्रीममध्ये रसायनांचा वापर केला जात आहे. ज्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे आपल्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं त्याचसोबत आपल्या त्वचेमधील पेशी कायमच्या खराब होऊ शकतात. आपलं प्रॉडक्ट विकलं जावं यासाठी अनेक कंपन्या हे प्रॉडक्ट पूर्णपणे ऑरगॅनिक आणि नॅचरल असल्याचा दावा करतात. त्यामुळे अनेक लोकांनी ऑरगॅनिक आणि नॅचरल स्किनकेअर प्रॉडक्ट वापरण्यास सुरुवात केली आहे. पण नॅचरल घटकांच्या दाव्यावर अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जातं. रिफ्रेश बोटॅनिकल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष जगवीर सिंग यांनी ऑरगॅनिक स्किनकेअरबाबत लोकांमध्ये असलेल्या 5 सर्वसाधारण गैरसमजांबद्दल सांगितलं आहेत. ते तुम्हाला तुमच्या समजावर पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करतील. त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. घरी बनवलेले ऑरगॅनिक फेस मास्क आणि लोशन ऑरगॅनिक प्रॉडक्टसारखंच कार्य करतात - योगर्ट आणि मध यांचं मिश्रण करून फेस मास्क म्हणून वापल्याने तुम्हाला विकतच्या ऑरगॅनिक फेसमास्कप्रमाणेच फायदा होईल, असं वाटत असतं. पण बऱ्याचदा अनेक स्किनकेअर ब्रँड वनस्पतीमधून ऑरगॅनिक रेणू (organic molecules) काढतात. तुम्ही DIY फेस ट्रीटमेंट करणार असाल, तर तुमच्या स्वयंपाकघरातले घटक आणि ऑरगॅनिक स्किनकेअर प्रॉडक्टमध्ये असलेल्या सक्रिय घटकांची तुलना केली जाऊ शकत नाही. प्रॉडक्टमधील विशेष घटक काढलेले असतात. त्यामुळे ते त्वचेची काळजीसाठी सक्रियपणे घेतात. - ऑरगॅनिक प्रॉडक्ट प्रभावी नसतात - - बऱ्याच जणांना वर्षानुवर्षं वापरत असलेलं प्रॉडक्ट बदलण्याची भिती वाटते. दुर्दैवाने औषधांच्या दुकानात मिळणारी अनेक प्रॉडक्ट्सची तीव्रता कमी केलेली असते, त्यात पाणी घातलेलं असतं आणि त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी रासायनिक संरक्षक भरपूर प्रमाणात वापरलेले असतात. त्यामुळे त्या प्रॉडक्टच्या वापरातून क्विक रिझल्ट्स मिळू शकतात; मात्र दीर्घकालीन फायदा होणार नाही. दुसरीकडे, ऑरगॅनिक प्रॉडक्टमध्ये महत्त्वपूर्ण पोषक द्रव्यं, अँटीऑक्सिडंट्स (antioxidants), जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ असतात, जी तुमच्या त्वचेसाठी खूपच गरजेची असतात. याच्या वापराने तुमच्या त्वचेला लगेच उजाळा मिळेल. तो खरा असेल. ऑरगॅनिक प्रॉडक्टमुळे तुमची त्वचा तेजस्वी, पाणीदार आणि स्वच्छ होते. काही काळ वापर केल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्र नक्की विचारतील, की तुम्ही त्वचेवर ग्लो आणण्यासाठी काय करत आहात. तेव्हा स्वत:ला तुम्ही त्यामागचं रहस्य नक्की सांगा. ऑरगॅनिक स्किनकेअर प्रॉडक्टचा आपल्या त्वचेच्या आरोग्यावर दीर्घ काळ टिकणारा परिणाम होतो. - ऑरगॅनिक प्रॉडक्ट (Organic Product) जास्त काळ टिकण्यासाठी संरक्षकांची (Preservative) गरज असते - - ऑरगॅनिक प्रॉडक्टला बर्‍याचदा प्रीमियम पॅकेजिंगची आवश्यकता असते. ती पॅकेजिंग एअरलेस पंपासह सुसज्ज असतात. या एअरलेस पंपामुळे ऑरगॅनिक प्रॉडक्ट खराब होत नाहीत. अन्यथा त्यातल्या वनस्पतिजन्य घटकांचं ऑक्सिडेशन होण्याची शक्यता असते. तुम्ही ऑरगॅनिक स्किनकेअर प्रॉडक्ट खरेदी करत असाल तर एअरलेस पंप असलेलं प्रॉडक्ट खरेदी करा. म्हणजे हे ऑरगॅनिक प्रॉडक्ट पंपाद्वारे कंटेनरमधून डायरेक्ट बाहेर टाकलं जातं. - उत्कृष्ट त्वचेसाठी हेल्दी डाएट (Healthy Diet) पुरेसं आहे- चांगल्या त्वचेसाठी स्वच्छ, अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ खाणं आणि भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं, यात काय दुमत नाही; पण उत्कृष्ट त्वचेसाठी फक्त हेल्दी डाएट पुरेसा नसतो. आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असला. तरीसुद्धा चांगला आहार तुमच्या चेहऱ्यावरील अशुद्धी किंवा विषयुक्त द्रव्यं घालवून टाकू शकत नाही. ते काम फेसवॉश करतो. त्यामुळे चांगलं खाणं, योग्य व्यायामाबरोबरच ऑरगॅनिक स्किनकेअरची जोड आवश्यक आहे.

- सर्व नैसर्गिक प्रकारचे स्किनकेअर एकसारखेच तयार केले जातात - - ऑरगॅनिक आणि नॅचरल प्रॉडक्टमध्ये एक अंधूक रेषा आहे. लक्षात ठेवा, की आपण याठिकाणी नॅचरल (Natural) या शब्दाचा वापर करत आहोत, ऑरगॅनिक नाही. बरीच प्रॉडक्ट्स आपल्या लेबलवर ऑल नॅचरल असल्याचा दावा करू शकतात. याचा अर्थ असा होत नाही, की त्यामधील घटक ऑरगॅनिक आहेत. नॅचरल प्रॉडक्टमध्ये बर्‍याचदा नॅचरल घटक असतात. परंतु त्यात कीटकनाशकं आणि इतर हानिकारक रसायनंही असू शकतात. अवश्य वाचा -   Sexual Wellness : 'समलिंगी मित्रासोबत राहिल्याने मीसुद्धा तसाच होईन का?'

त्वचेची देखभाल करणाऱ्या ब्रँडला ऑरगॅनिक (Organic) म्हणजे सेंद्रिय असल्याचा दावा करण्यासाठी कडक प्रक्रियेतून जावं लागतं. वापरलेल्या घटकांच्या उत्पादनासाठी शेती करण्याची पद्धत, कीटकनाशकं, तणनाशकं आणि रसायनांपासून त्यांची शेती मुक्त आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी बरीच वर्षं त्याचं परीक्षण केलं जातं. सध्याच्या काळात रासायनिक पदार्थ असलेल्या प्रॉडक्टबाबत ग्राहकांमध्ये हळूहळू जागरूकता वाढत चालली आहे. ज्या प्रॉडक्टवर नॅचरल ऑरगॅनिक स्किनकेअर असं लिहिलेलें असते त्याबाबत ग्राहक खूप जागरूक असतात आणि ते व्यवस्थित तपासूनच ते प्रॉडक्ट खरेदी करतात. हीच जागरूकता लोकांचा कल जास्तीत जास्त ऑरगॅनिक प्रॉडक्टकडे वाढवण्यासाठी मदत करत आहे. बरेच ग्राहक आपल्या रोजच्या वापरातील प्रॉडक्टमध्ये रासायनिक घटक नाहीत ना हे तपासून पाहतात.
Published by:news18 desk
First published:

Tags: Health, Lifestyle, Skin, Skin care, Wellness

पुढील बातम्या