जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! पाण्याचा थेंब जरी शरीरावर पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका

बापरे! पाण्याचा थेंब जरी शरीरावर पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका

बापरे! पाण्याचा थेंब जरी शरीरावर पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका

पाणी म्हणजे या तरुणीसाठी अॅसिड आहे, त्याच्या संपर्कात येताच तिच्या त्वचेवर मोठमोठे फोड येतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 28 फेब्रुवारी : कुणाला थंड पाणी प्यायल्यामुळे त्रास होतो, कुणाला थंड किंवा जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यावर त्रास होतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका तरुणीला पाण्यामुळे इतका त्रास होते की पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला असा विचित्र आजार आहे, ज्यामुळे तिला स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे (Woman skin burn from water). यूकेतील केंटमध्ये राहणारी 19 वर्षांची एब्बीची प्लम्मर (Abbie Plummer). तिची त्वचा इतकी संवेदनशील आहे की पाण्याच्या संपर्कात येताच तिची त्वचा जळते. पाणी लागताच तिच्या त्वचेवर मोठ मोठे फोड येतात. अगदी घाम आणि डोळ्यातील अश्रूंमुळेही तिला हा त्रास होतो. ज्यामुले तिला डोळ्यातील पाणी रोखावं लागतं. घाम येताच तिचा घाम अॅसिडमध्ये बदलतो आणि तिची त्वचा जळते. पावसाळ्यातही ती घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ती पाण्यापासून दूर राहते. हे वाचा -  तुमचा आवाज तर बदलला नाहीये ना? या लक्षणांकडे चुकुनही करू नका दुर्लक्ष 2018 साली तिला त्वचेची समस्या सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की कोणत्या शाम्पूमुळे तिला ही समस्या झाली असावी. तिला तशी औषधं देण्यात आली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर एब्बीला  Aquagenic Urticaria  असल्याचं निदान झालं. ज्यामध्ये पाण्याची अॅलर्जी असते. पाणी साधं असो वा गरम त्याच्या संपर्कात येताच त्वचेवर त्याचे रिअॅक्शन होतात. एब्बीने सांगितलं, पाणी प्याल्याने तिला काही त्रास होत नाही. पाणी शरीरात गेल्यावर अशी काही रिअॅक्शन होत नाही. फक्त अंघोळ केल्यावर किंवा त्वचेवर पाणी पडल्यावर असं होतं. त्यामुळे 10 मिनिटांत पटापट अंघोळ करून ती लगेच आपलं शरीर सुकवते. पण त्यानंतरही तिच्या शरीरावर रॅशेस येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात