मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बंद डोळ्यांनी सोडवते Rubik Cube; भारताची वंडर किड तनिष्का लय भारी

बंद डोळ्यांनी सोडवते Rubik Cube; भारताची वंडर किड तनिष्का लय भारी

Tanishka Sujit

Tanishka Sujit

फक्त रुबिक क्यूब (Rubik Cube) सोडवणं नाही तर तनिष्का सुजित (Tanishka Sujit) बंद डोळ्यानं वाचू आणि लिहूसुद्धा शकते.

इंदोर, 04 फेब्रुवारी : रुबिक क्यूब (Rubik Cube) कमीत कमी वेळात सोडवणं हे अनेकांचं उद्दिष्ट असतं. कित्येकांना उघड्या डोळ्यांनीही हे शक्य होत नाही. पण मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदोरमधील (Indore) 13 वर्षांची तनिष्का सुजित (Tanishka Sujit) चक्क बंद डोळ्यांनी रुबिक क्यूब सोडवते. त्यामुळे तिला 'वंडर किड' (Wonder Kid) असं म्हटलं जातं.

बंद डोळ्यांनी परफेक्ट रुबिक क्यूब सोडवणाऱ्या तनिष्काचा व्हिडीओ एएनआयनं (ANI) ट्वीट केला आहे. त्यात तनिष्काच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली दिसत असून, ती रुबिक क्यूब सोडवत आहे. अर्थात तिची हुशारी केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती डोळ्यांवर पट्टी बांधून लिहू आणि वाचूही शकते, असं तिनं सांगितलं.

एएनआयशी बोलताना तनिष्का म्हणाली,  'मी दहावीची परीक्षा वयाच्या 11 व्या वर्षी दिली आणि 12 वीची परीक्षा वयाच्या 12 व्या वर्षी दिली. एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझ्या नावाची नोंद झाली आहे,'

तनिष्काचं उत्तम कौशल्य पाहून त्या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका युझरने असं म्हटलं आहे, की 'माझ्या आई-वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला, तर मला बोलणी खावी लागतील.'आणखी एका युझरने असं म्हटलं आहे की, भारतात टॅलेंटची काही कमतरता नाही.

हे वाचा - या अमेरिकन रॅपरनं कपाळावरच जडवला कोट्यवधींचा हिरा, पाहा व्हायरल VIDEO

तनिष्काच्या या आश्चर्यकारक टॅलेंटचं श्रेय तिच्या वडिलांना जातं. गेल्या वर्षी जुलैमध्ये कोविड-19 मुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तनिष्काची आई म्हणाली, तिला बालवर्गात, शिशुवर्गात घातलेलंच नव्हतं. तिला घरीच शिकवण्यात आलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला एका खासगी शाळेत एकदम तिसरीत घालण्यात आलं.

'आयबीटाइम्स'मध्ये आलेल्या वृत्तानुसार, तनिष्का सध्या इंदोरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन करते आहे. त्याआधी तिला बारावीची परीक्षा देण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली. बारावीत कॉमर्स शाखेत तिला 62.8 टक्के गुण मिळाले.

हे वाचा - गर्लफ्रेंड बनून बायकोनंच भेटायला बोलावलं; भररस्त्यात आंबटशौकिन नवऱ्याला धुतलं

13 वर्षांच्या तनिष्काला तिच्या स्वप्नाबद्दल विचारलं असता ती म्हणते, तिला भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) जायचं आहे आणि देशाची सेवा करायची आहे. तनिष्का कथक नर्तक असून, तिला नृत्यातही पीएचडी करायची आहे.

First published:

Tags: Indore, Madhya pradesh, Record, Social media