Home /News /lifestyle /

फक्त एका फुफ्फुसासह कोरोनाशी लढली, पण हार मानली नाही; 12 वर्षांच्या दिव्यांग मुलीची अखेर व्हायरसवर मात

फक्त एका फुफ्फुसासह कोरोनाशी लढली, पण हार मानली नाही; 12 वर्षांच्या दिव्यांग मुलीची अखेर व्हायरसवर मात

एका फुफ्फुसामुळे आधीपासूनच ती ऑक्सिजनवर होती, त्यात तिला कोरोना झाला आणि परिस्थिती अधिकच गंभीर झाली.

    भोपाळ, 25 जून : कोरोनाव्हायरस (Coronavirus) फुफ्फुसावर (Lung) गंभीररित्या परिणाम करतो आहे. कित्येकांना ऑक्सिजन (Oxygen), व्हेंटिलेटरची गरज पडते आहेत. अशात आधीपासूनच आयुष्याशी एका फुफ्फुसावर जीवन जगण्यासाठी झुंजणाऱ्या एका दिव्यांग मुलीने कोरोनासारख्या (Girl fight with corona on one lung) महाभंयकर आजाराशी एका फुफ्फुसासह लढा दिला आणि त्यावर तिने मातही केली आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदोरमधील (Indore) 12 वर्षांची सिमी दत्त (Simi dutt). जन्मापासून तिला एक हात नाही. तिचं एक फुफ्फुस आणि एक किडनीही नीट विकसित झाली नाही, असं एनएआयशी बोलताना तिच्या वडीलांना सांगितलं. एका फुफ्फुसामुळे आधीपासूनच तिला ऑक्सिजनची गरज पडते. सध्या कोरोना काळात रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होताना दिसते आहे पण सिमी या समस्येचा आधीपासूनच सामना करते आहेत. त्यात तिला कोरोना इन्फेक्शन झालं आणि त्यानंतर मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली. हे वाचा - Delta plus चा धोका वाढत असताना पुण्यात तातडीने सुरू झालं मोठं काम रिपोर्टनुसार सिमी आणि तिची आई अंजूला कोरोना झाला. दोघांमध्येही लक्षणं नव्हती.  सामान्यपणे थोडा जरी व्यायाम केला तरी सिमीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 60-65 वर पोहोचते. झोपताना तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी तिला तिला रात्री ऑक्सिजनची गरज पडायची. कोरोना संक्रमण झाल्यानंतर तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 40-50 पर्यंत कमी झाली.  मग डॉक्टरांच्या सल्लानुसार तिला घरीच बाइपेप आणि ऑक्सिजन लावण्यात आलं. हे वाचा - Explainer : लाँग कोविड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि परिणाम सिमीने हार मानली नाही. तिने कोरोनाला टक्कर दिली आणि अखेर तिने कोरोनालाही आपल्या जिद्दीसमोर नमवलं. तिने कोरोनाशी लढा जिंकला पण तिचा जगण्याचा लढा मात्र अद्याप संपलेला नाही. तो तसाच सुरू आहे. पण कित्येक कोरोना रुग्णांसाठी ती एक प्रेरणा ठरली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या