कोल्हापूर, 20 मे : संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आलेत, तर अनेक ठिकाणी लॉकडाउन (Lockdown) जारी करण्यात आला आहे आणि या सगळ्या कालावधीत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. कोल्हापूर (Kolhapur) मधला असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओ मागचं सत्य काय ? कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येत्या 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी सध्या जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक पोलिस रस्त्यावर उतरले आहेत पण याच कोल्हापूर मधल्या लॉकडाऊन काळातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ते ठिकाण आहे कोल्हापूर शहरातली माळकर तिकटी.
या भागात पोलीस गस्त घालत असतात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस पकडत असतात आणि असेच दोन दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात सापडतात तोवर त्याच वेळी त्या ठिकाणी एक रुग्णवाहिका दाखल होते त्यातून तीन ते चार पीपीई किट घातलेले आरोग्य कर्मचारी गाडीमधून उतरतात आणि त्या दोन्ही दुचाकीस्वारांना बळजबरीने ॲम्बुलन्समध्ये घालतात आणि निघून जातात. या व्हिडिओने कोल्हापूर शहरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली ग्रामीण भागातही या व्हिडीओची चर्चा जोरदार सुरू झाली. अशा पद्धतीने रुग्णवाहिकेमध्ये बळजबरीने घालणं बरोबर आहे की चुकीचं याच्या ही चर्चा चौकाचौकांमध्ये पाहायला मिळू लागल्या. कुणालाही समजू न देता Facebook वर Online राहायचं आहे? वापरा या सोप्या स्टेप्स पण या व्हिडिओ मागचे सत्य न्यूज 18 लोकमतला समजले ते काही वेगळं होतं. एक सामाजिक संस्था कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक डॉक्युमेंट्री बनवत आहे आणि याच डॉक्युमेंट्रीसाठी अनेक ठिकाणी सध्या शूट करण्यात येत आहेत. माळकर तिकटी प्रमाण, त्यांनी दसरा चौक, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक या भागात अनेक जनजागृती बाबतचे व्हिडिओ शूट करण्यात आलेत. माळकर तिकटी येथे शुटिंग सुरू असताना उंच इमारतीवरून कोणीतरी मोबाईलवरून हे शूट केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि ज्यावेळी एनजीओच्या डॉक्युमेंटरी बाबतची ही माहिती कोल्हापूरकरांना समजली त्यानंतर मात्र कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण कोरोना काळात खरंच सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे विनाकारण घराबाहेर जाणं टाळलं पाहिजे.