राज्याची रुग्णसंख्या कमी मात्र 'या' जिल्ह्यात कोरोनाचं संकट कायम; लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता

राज्याची रुग्णसंख्या कमी मात्र 'या' जिल्ह्यात कोरोनाचं संकट कायम; लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता

सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्यादृष्टीने लावण्यात आलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

  • Share this:

सांगली, 23 मे : सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. सध्या पॉझिटिव्ह रेट हा 22 टक्के इतका आहे, आणि तो दहा टक्क्यांपर्यंत येणे अपेक्षित आहे. तर सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्यादृष्टीने लावण्यात आलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. असे मत व्यक्त पालकमंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठक नंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कोरोना संख्या कमी करायची असेल तर जास्त टेस्टिंग करण्याचा प्रयत्न आहे. टेस्टिंग वाढवल्यामुळे 22 टक्के इतका दर झालेला आहे. मात्र हा दर दहा टक्क्यांच्या खाली यायला पाहिजे, तो खाली येण्याच्या दृष्टीने व कोरोना रुग्ण संख्या कमी येण्यासाठी सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनचे उचललेलं पाऊल आणखी काही दिवस कायम ठेवण्यासाठी आणि कोरोना रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल आणखी काही दिवस कायम ठेवण्याचे मत व्यक्त होत आहे.

हे ही वाचा-Corona Update : रविवारी दोन महिन्यातली नीचांकी रुग्णसंख्या, मृत्यूचा आकडा घटेना

5 मे पासून 26 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सूचक वक्तव्य करत लवकरच याबाबत लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 23, 2021, 10:23 PM IST

ताज्या बातम्या