कोल्हापूर, 27 मे : वेगाने वाहणारा वारा आणि बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर पुन्हा 24 हजार फूट उंचीच्या कॅम्प 3 मध्ये सुखरूप परतली आहे. देशावर कोरोनाच संकट असताना कोल्हापूरची 20 वर्षीय कस्तुरी सावेकर सध्या मिशन एव्हरेस्टवर आहे. अनेक महिन्यांनंतर तिचं हे स्वप्न साकार होत असतानाच कस्तुरीला खराब हवामानामुळे कॅम्प 3 वर परताव लागलं आहे. सध्या एवरेस्ट जवळ वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. त्यामुळे अनेक गिर्यारोहकांना पुढे चढाई करणं अशक्य झाल आहे. कॅम्प 3 वर सध्या हेलिकॉप्टरने ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यात आले असून कस्तुरी सोबत 40 गिर्यारोहकांचाही समावेश या मिशन एव्हरेस्ट मध्ये आहे, त्यामुळे वाऱ्याचा वेग पाहूनच पुढील चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या 50 फुटाच्या पुढचं त्या भागात काहीही दिसत नसून सगळे टेन्ट, कपडे ओले झाले आहेत. दोन्ही वेळचं जेवण त्यांना पाठवण्यातही अनेक अडचणी येत असून गरजेचे साहित्यही वरती येऊ शकत नसल्याने अनेक गिर्यारोहक सध्या कॅम्प 3 वर अडकून पडले आहेत. नेपाळच्या अधिकृत बेसकॅम्पवरून बाबू शेर्पा कॅम्प 3 वरून जितेंद्र गवारे व गिरीप्रेमीचे एव्हरेस्ट मोहिमेचे लीडर उमेश झिरपे यांच्या कडून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी पुढे सांगितलं कॅम्प 3 वर प्रचंड स्नो फॉल, पाऊस व प्रचंड वारा वाहत आहे.
सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. कारण 50 फूटाच्या पुढचे काहीही दिसत नाही. टेन्ट ओले झाले आहेत. कपडे ओले झाले आहेत. कपडे वाळवणे शक्य नाही. खाण्याचे साहित्य संपत आले आहे. दुपारचे जेवण इतर ग्रुपकडून मागावे लागले. रात्रीची सोय कशीतरी होईल. स्नो फॉलमुळे बेसकॅम्प वरून खाण्याचे साहित्य वर येऊ शकत नाही. बेस कॅम्पवरचे टेन्ट फाटलेत व जमिनही खचत चालली आहे. हे बेसकॅम्प वरील बाबू शेर्पा यांच्याकडून समजले आहे.
हे ही वाचा-विनाकरण बाहेर फिरणाऱ्यांना रुग्णवाहिकेत उचलून नेलं? कोल्हापुरमधील VIDEO चं सत्य
कॅम्प 3 वरील कांही शेर्पा लोक वर जाण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण रोप बर्फाखाली गाडले गेले आहेत ते काढणे फार अवघड असते. या बिकट परिस्थितीत कुस्तुरी सह अन्य गिर्यारोहक वेदर विंडो मिळेल अशी आशा बाळगुन हिम्मत न हरता चढाईची वाट पहात आहेत. अशा परिस्थितित पिकप्रमोशनची टिम गिरीप्रेमीची टीम आणि इतर एजन्सीचे लोक असे मिळून जवळपास 300 लोक कॅम्प 3 वर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Mount Everest