कोल्हापूर, 21 जुलै : पुरोगामी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात (Karveer Tehsil) बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र (Illegal Sex determination) चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापुरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर येथील परिते - कुरुकली इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान सेंटर चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राणी कांबळे या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी ज्यावेळी गर्भलिंग सेंटरवर छापा टाकला त्यावेळी ही आरोपी राणी घटनास्थळावरुन पळून गेली होती.
डॉक्टर असल्याचा बहाणा करून राणी कांबळे, महेश पाटील आणि साथीदारांसमवेत करवीर तालुक्यातील परिते कुरुकली इथं एका घरात गर्भलिंग निदान सेंटर सुरू केलं होतं. या प्रकाराची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळताच कापळा रचण्यात आला आणि त्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी सोनोग्राफी मशीनसह इतर साहित्य जप्त केले आहे.
चाकण ATM स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
धक्कादायक म्हणजे यापूर्वीही म्हणजेच 2017 सारी गर्भलिंगनिदान प्रकरणी राणी कांबळेला कागल पोलिसांनी अटक केली होती केली होती. मात्र ती जामिनावर सुटली होती. पण या निमित्ताने ग्रामीण भागात अजूनही गर्भलिंग निदान केल जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इतकेच नाही तर हे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र आरोपी महिला केवळ एकटी चालवत नसावी तर तिला इतरकाही जणांचा पाठिंबा असावा असाही दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.