मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मृत्यूनंतरही सोडली नाही एकमेकांची साथ; लग्नाच्या तयारीदरम्यानच प्रेमी युगुलाने घेतला शेवटचा श्वास

मृत्यूनंतरही सोडली नाही एकमेकांची साथ; लग्नाच्या तयारीदरम्यानच प्रेमी युगुलाने घेतला शेवटचा श्वास

दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्या कारणाने कुटुंबाकडून लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले होते.

दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्या कारणाने कुटुंबाकडून लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले होते.

दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्या कारणाने कुटुंबाकडून लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले होते.

  • Published by:  Meenal Gangurde
उत्तर प्रदेश, 15 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) औरेयामधून एक अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच या जोडप्याला जग सोडावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचं 10 डिसेंबर रोजी लग्न होणार होतं आणि त्याच्या खरेदीसाठी दोघे कानपुरला गेले होते. मात्र घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक (Road Accident) दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेनंतर दोघांच्या घरात शोककळा पसरली आहे. सांगितलं जात आहे की, मृत सचिन श्रीवास्तव आणि सोनी एकाच भागात राहत होते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेम संबंध होते. या लग्नासाठी दोघांनी आपआपल्या कुटुंबाला कसंबसं तयार केलं होतं. वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे दोघांना आपल्या कुटुंबाचा होकार मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. सचिन श्रीवास्तव सीबीआयमध्ये क्लर्क पदावर तैनात होता. दोघांचा साखरपुडादेखील झाला होता आणि दोन्ही कुटुंब लग्नाची तयारी करीत होते. मात्र या घटनेमुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. हे ही वाचा-औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप अपघातानंतर घरातील सदस्यांना दु:ख अनावर... मृत्यूची सूचना मिळताच दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. दोघांचे मृतदेह घरी येताच घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. या प्रेमी जोडप्यावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या बातमीमुळे आनंदी झालेलं वातावरण आता दु:खात बदललं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याशिवाय त्या अज्ञात वाहनाचादेखील शोध घेतला जात आहे. आनंदी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्याचा अशा शेवटामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लग्नाला काही दिवस शिल्लक असताना तरुण जोडप्याच्या मृत्यूमुळे सर्वांना निशब्द केलं आहे.
First published:

Tags: Crime news, Marriage, Road accident, Uttar pradesh

पुढील बातम्या