मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /Maharashtra Unlock : 'या' सहा जिल्ह्यांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं अलर्ट

Maharashtra Unlock : 'या' सहा जिल्ह्यांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं अलर्ट

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

या सहा जिल्ह्यांत भीती कायम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कोल्हापूर, 8 ऑगस्ट : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक जिल्ह्यांमधील पॉझिटिव्ही रेट आणि रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनासह राज्यावर आलेल्या निसर्गाच्या संकटाचा आणि त्यासाठी केलेल्या मदतीचा आढावा दिला. (Maharashtra Unlock)

दरम्यान राज्यातील या सहा जिल्ह्यांना अलर्ट केलं आहे. या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नसल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा-नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण, छगन भुजबळांनी दिली महत्त्वाची माहिती

काय म्हणाले मुख्यमंत्री..

जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, तिथे नियम हे पाळावेच लागणार आहे. पुण्यात दररोज ९०० रुग्ण वाढत आहे. सोलापुरात ६०० रुग्ण वाढत आहे, कोल्हापुरात दररोज ५०० रुग्ण संख्या वाढत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे या जिल्ह्यांची काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय यंत्रणा एकच काम करत आहे. त्यामुळे ही यंत्रणा थकली आहे, असं नाही.

कोरोनाची लाट अजून काही गेली नाही. मागील वर्षी गणेशोत्सव, दिवाळी आणि नवरात्र कोरोनाच्या लाटेत साजरे करावे  लागले. त्यानंतर दोन लाटा आल्या होत्या. लशीचा साठा हळूहळू वाढत आहे. पण, जोपर्यंत लशीचा साठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागली.

जर राज्यात तिसरी लाट आली तर आरोग्य व्यवस्थेत जिथे कुठे आपण कमी पडलो, त्या ठिकाणी काम करत आहोत. पूर्वी दोन कोरोनाच्या टेस्ट लॅब होत्या आता त्या ६०० वर पोहोचल्या आहे. आयसीयूचे बेड वाढवले आहे, व्हेंटिलेटर वाढवले आहे.

फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची लाट गेली अशी शक्यता होती. तेव्हा परिस्थिती खूप चांगली होती. पण, अचानक विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. कुटुंबांचे कुटुंब बाधित होत होते. तेव्हा असं लक्षात आले की, कोरोनाचा व्हेरियंट बदलला होता. डेल्टा व्हेरियंटने वाढ केली होती. यासाठी मुंबईत विशेष लॅब सुरू केली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Kolhapur, Udhav thackarey