कोल्हापूर, 5 मे: राज्याच्या विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातही आज विजांचा जोरदार कडकडाट पहायला मिळत आहे. त्यातच आता वीज थेट इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवर कोसळली (lightning strike on transformer). ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कोल्हापूरमध्ये ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळली; घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद#Kolahpur #lightining #unsasonalrain #कोल्हापूर pic.twitter.com/H24llsMcLd
— News18Lokmat (@News18lokmat) May 4, 2021
कोल्हापूरात सायंकाळच्या सुमारास अचानक वीजांचा कडकडाट सुरू झाला आणि प्रतिभानगर परिसरात असलेल्या वीजेच्या ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळली. ही घटना एका व्यक्तीच्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळल्याने या परिसरातील वीज पूरवठा खंडित झाला आहे.
Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा
पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस
राज्यातील विविध भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघग्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रविवारी राज्याच्या विविध भागांत वीज कोसळून तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जनावरे सुद्धा दगावली होती. तर सोमवारी सुद्धा सातारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Viral video.