कोल्हापूर, 05 जुलै: कोल्हापूर (Kolhapur) शहरातील निर्बंध (Kolhapur Restrictions) पाच दिवसांसाठी हटवण्यात आलेत. त्यानंतर आजपासून कोल्हापुरातील दुकानं सुरु झाली आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकान खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरात सोमवार ते शुक्रवार सगळी दुकान खुली करण्याची मुभा दिली आहे. परिस्थिती पाहून शनिवारी पुन्हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
कोल्हापूर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला pic.twitter.com/mw0iefmRoo
— News18Lokmat (@News18lokmat) July 5, 2021
ही परवानगी सोमवार 5 जुलै ते शुक्रवार 9 जुलै या कालावधीमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळासाठी देण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर शहरातील निर्बंध 5 दिवसांसाठी हटवले pic.twitter.com/OPFVNqha5o
— News18Lokmat (@News18lokmat) July 5, 2021
सर्व काही सुरू झाले आहे, असे समजून नागरिकांनी गरज नसतानाही घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे रुग्ण संख्या वाढली तर सरकारला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊन शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत, असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.