पन्हाळगडाच्या पायथ्याशी काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना, दुसरं 'माळीण' होता होता वाचलं LIVE VIDEO

पन्हाळगडाच्या पायथ्याशी काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना, दुसरं 'माळीण' होता होता वाचलं LIVE VIDEO

पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळवार पेठमधील काही परिसरात पन्हाळयाची तटबंदी कोसळली.

  • Share this:

कोल्हापूर, 28 जुलै : राज्यात कोकण (kokan flood) आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. सातारा (satara), रायगडमध्ये (raigad) दरडी कोसळून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. पण, दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. कोल्हापुरात पन्हाळ गडाच्या (panhala fort) पायथ्याशी असलेला गावाजवळ तटबंदी कोसळली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ गडाच्या पायथ्याला दुसर माळीण होता होता वाचलं आहे. पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळवार पेठमधील काही परिसरात पन्हाळयाची तटबंदी कोसळली असल्याचं समोर आलं आहे. तटबंदी कोसळून खाली वहात येत असताना ची दृश्य अंगावर शहारे आणणारी आहेत. ही घटना 3 दिवसापूर्वी घडली असून इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं.

पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गावात जोरात पाऊस सुरू होता. त्याचवेळी तटबंदी कोसळत होती. त्यानंतर सकाळी आम्ही 6 वाजेच्या सुमारास घराबाहेर येऊन थांबलो होते. गावातील इतर लोकंही बाहेर आली होती. आम्ही सगळे इथून दूर जाण्याच्या तयारीत होतो. त्याचवेळी तटबंदी कोसळली. भले मोठाले दगड खाली आले, त्यामुळे मोठा आवाज झाला होता. गावातील आम्ही सगळे जण घाबरून गेलो होतो, अशी माहिती या गावातील एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिले.

Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, या तटबंदी कोसळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Published by: sachin Salve
First published: July 28, 2021, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या