Home /News /kolhapur /

shahu maharaj : राजर्षी छत्रपती शाहूंना बळीराजाकडून अभिवादन, थेट शेतातून कृतज्ञता केली व्यक्त

shahu maharaj : राजर्षी छत्रपती शाहूंना बळीराजाकडून अभिवादन, थेट शेतातून कृतज्ञता केली व्यक्त

शेतकरी, शेतमजूरांनी शेतीची (farmer) कामे सुरू असताना थेट शेताच्या बांधावरून शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

  कोल्हापूर, 7 मे: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (shahu maharaj) स्मृती शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शाहूंच्या विचारांचा जागर सुरू आहे. आज (दि. 06) मे रोजी स्मृती शताब्दीदिनी सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात नागरिकांकडून १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूरांनी शेतीची (farmer) कामे सुरू असताना थेट शेताच्या बांधावरून शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

  मागच्या दोन दिवसांपासून शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित (Memorial Century Year) १०० सेकंद स्तब्धता पाळण्यासाठी खेडे गावातील ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांनी आज उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय, शाळा, तसेच विविध कार्यालयात शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले.

  हे ही वाचा : देशातील 'या' नागरिकांना 9 महिन्यांपूर्वीच कोरोनाचा बुस्टर डोस द्यावा, NTAGI ची महत्त्वाची सूचना

  सकाळी १० वाजता जो जिथे असेल तिथे जागच्या जागी १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. दरम्यान कोल्हापूर शहरात असणाऱ्या शाहू समाधी स्थळावर विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली. 

   लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झाले. जिथे असेल त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना कोल्हापूरकरांनी मानवंदना दिली. कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्‍नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जाग्यावर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

  कोल्हापूर जिल्ह्यातून 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी

  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू ज्योती चे स्वागत केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी कार्यकर्ते शाहू ज्योती घेऊन आले होते. शाहूवाडी येथून 45 किलोमीटर चे अंतर धावत ही शाहू ज्योत समाधी स्थळी आणण्यात आली.  कोल्हापूर शहरातील पाण्याचा खजिना येथून आणलेली शाहू ज्योत मिरजकर तिकटी, केशवराव भोसले नाट्यगृह, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे समाधीस्थळी आली.

  शाहू जन्म स्थळावरून कसबा बावडा येथील शाहू प्रेमींनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, खानविलकर पंप यामार्गे तर नवीन राजवाडा या ठिकाणाहून महावीर कॉलेज मार्गे ही ज्योत  समाधीस्थळी पोहोचली. रेल्वे स्टेशन वरुन दसरा चौक मार्गे कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे  कलाकार ज्योत  घेऊन आले. शाहू मिल येथून बिंदु चौक, लक्ष्मीपुरी दसरा चौक मार्गे संयुक्त राजारामपुरीचे कार्यकर्ते ज्योत घेऊन आले. सोनतळी येथून वडणगे फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि शाहू प्रेमींनी समाधी स्थळी मशाल आणली.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Kolhapur

  पुढील बातम्या