कोल्हापूर, 9 जुलै : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (Kolhapur District Milk Producers Association) अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत 25 वर्षांनी सत्तांतर झाल्यावर आज झालेल्या बैठकीत गोकुळ दूध खरेदी (Gokul Milk Purchase price hike) आणि विक्री दरात वाढ (Gokul Sale Price Hike) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी खरेदी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेत गोकुळने दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे तर त्याचवेळी विक्री दरातही वाढ करत सर्वसामान्यांना झटका दिला आहे.
दूध खरेदी दरात वाढ
गोकुळ दूध उत्पादक संघाने म्हैस दूध खरेदी दरात 2 रुपयांची तर गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने कोरोना परिस्थितीत दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 11 जुलै पासून दरवाढ लागू होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.
Exclusive: मुंबईकरांना GOOD NEWS मिळणार; नियम शिथिल होण्याची शक्यता, लोकल सुरू होणार?
मुंबई-पुण्यात होणार विक्री दरवाढ
खरेदी दरासोबतच विक्री दरातही वाढ होणार आहे. विक्री दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात गोकूळ दूध संघाने देखील दूध विक्री दारात 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता याचा फटका मुंबई आणि पुणेकरांना बसणार आहे. विक्री दरवाढ 11 जुलै पासून लागू होणार आहे.
अमूल पाठोपाठ गोकूळ दूध संघाचा दूध विक्री दर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे दूध ग्राहकांना फटका तर दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. 11 तारखेपासून दुध विक्री आणि खरेदी दरांची होणार अंमलबजावणी लागू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur