• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Exclusive: मुंबईकरांना GOOD NEWS मिळणार; नियम शिथिल होण्याची शक्यता, लोकल सुरू होणार?

Exclusive: मुंबईकरांना GOOD NEWS मिळणार; नियम शिथिल होण्याची शक्यता, लोकल सुरू होणार?

Mumbai guidelines may be relaxed: मुंबईतील कोविड नियमांबाबत लागू असलेल्या नियमांत शिथिलता येण्याची दाट शक्यता आहे.

  • Share this:
मुंबई, 9 जुलै : मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णवाढीत आता घसरण होत आहे त्यासोबतच जवळपास मुंबईकरांचे लसीकरणही (Vaccination in Mumbai) मोठ्या वेगाने सुरू आहे. रुग्ण संख्येत होत असलेली घसरण लक्षात घेता आता मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना एक आनंदाची बातमी (Good News for Mumbaikars) देणार असल्याची माहिती आहे. मुंबईत येत्या आठवड्याच्या सुरवातीलाच अनेक नियमांत शिथिलता लागू (Guidelines may be relaxed in Mumbai) होण्याची शक्यता आहे. जसे दुकानांना संध्याकाळी 6 पर्यंत मुभा दिली जाऊ शकते आणि इतरही महत्वाचे निर्णय सरकार घेऊ शकतं. यासंदर्भात मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी न्यूज18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सरकार टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत आहे, टास्क फोर्स विचार करत आहे की कशी शिथिलता आणली जाईल. लवकरात लवकर हे शक्य आहे आणि सरकार सकारात्मक आहे. कोणत्या नियमांत शिथिलतेची शक्यता रेस्टॉरंट आणि हॉटेल 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगीची शक्यता दुकाने संध्याकाळी 6 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगीची शक्यता थिएटर आणि मल्टिप्लेक्स 30% क्षमतेने खुली करण्यास परवानगीची शक्यता ऑफिसमध्ये  60% उपस्थिती टॅक्सीमध्ये ड्रायव्हरसह 4 जणांना प्रवासाची परवानगीची शक्यता मॉल/ मल्टिप्लेक्स 11 ते 4 पर्यंत खुले ठेवण्यास परवानगीची शक्यता ओबीसी राजकीय आरक्षण: "फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला टाईमपास करायचाय" फडणवीसांनी सांगितलं कारण... लोकल ट्रेनबाबत काय होणार निर्णय? ट्रेनमध्ये लोकांना कसं प्रवास करण्याची संधी देता येईल का, हॉटेल दुकानांची वेळ कशी वाढवता येईल, कपड्याची दुकानं कशी उघडता येईल हे पाहत आहोत. ट्रेनचा विचार करताना तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागतोय, 100 टक्के लोकांना त्रास होतोय हे मान्य आहे. सगळ्या पॅरामीटरचा विचार करतोय. जोपर्यंत 50 ते 60 टक्के लोकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत कठीण आहे. अशीही माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात किती जिल्ह्यात लसीकरण होत नाहीये. हे सर्व केंद्र सरकारमुळे होतं आहे. येत्या आठवड्यात नक्की निर्णय घेऊ की रेस्टॉरंट 10 किंवा 11 पर्यंत खुल केलं जाऊ शकतं, संपूर्ण चेन आहे ही, सगळ्यासाठी विचार केला जातोय.
Published by:Sunil Desale
First published: