जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / 100 दिवसांनी कोल्हापुरात व्यापार सुरु, उत्साही व्यापाऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून काढली रॅली

100 दिवसांनी कोल्हापुरात व्यापार सुरु, उत्साही व्यापाऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून काढली रॅली

100 दिवसांनी कोल्हापुरात व्यापार सुरु, उत्साही व्यापाऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून काढली रॅली

Kolhapur All Shops Open From Today: कोल्हापुरातील (Kolhapur) व्यापार (traders) आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 19 जुलै: कोल्हापुरातील (Kolhapur) व्यापार (traders) आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार मग पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं सोमवारपासून दुकानं उघडण्याता निर्णय घेतला. दुकानं सुरु झाल्यानं व्यावसायिकांमध्ये खूप मोठा उत्साह दिसून येत आहे. कोल्हापुर मधल्या राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी आज दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली.

जाहिरात

सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेत फेरफटका मारला. दुकानदारांनी मास्क वापरा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. तब्बल 100 दिवसांनी पुन्हा एकदा व्यापार सुरू झाल्यानं उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी विशेष सवलत देणार असल्याचही घोषित केलं आहे.

कोल्हापुरातील कोरोनाची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 9.7 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दुकाने आजपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु असतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात