जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / सैन्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक; 6 वर्षांपासून गुंगारा देणारा भामटा अखेर गजाआड

सैन्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक; 6 वर्षांपासून गुंगारा देणारा भामटा अखेर गजाआड

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Kolhapur: भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो, असं सांगून कोल्हापूरसह औरंगाबाद येथील अनेक बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्या (money fraud) भामट्याला अखेर जेरबंद (Accused arrest) करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 15 नोव्हेंबर: भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो, असं सांगून कोल्हापूरसह औरंगाबाद येथील अनेक बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्या भामट्याला (Money Fraud) अखेर जेरबंद करण्यात (Accused arrested) पोलिसांना यश आलं आहे. 2016 साली आरोपीनं अनेक तरुणांना सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाणाने (Lure of job) लाखो रुपयांची फसवणूक केली होती. पैसे घेतले तरीही नोकरी लावली नाही, म्हणून काही तरुणांनी आरोपीविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल (FIR lodged) केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी गेल्या सहा वर्षांपासून फरार झाला होता. अखेर आरोपी भामट्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा दिला होता. पण अलीकडेच आरोपी मुंबईतील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असल्याची माहिती एका खबरीनं दिली होती. संबंधित माहितीच्या आधारे लक्ष्मीपुरी पोलिसांच्या एका पथकानं सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्यानं विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हेही वाचा- औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप संदीप दादु कांबळे असं अटक केलेल्या 37 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याने 2016 साली सैन्यात माझी ओळख आहे. त्याठिकाणी तु्म्हाला नोकरी लावतो, असं सांगून आरोपीनं लक्ष्मीपुरी येथील काही बेरोजगार तरुणांकडून पैसे घेतले होते. तसेच करवीर तालुक्यातील काही बेरोजगार तरुणांना देखील आरोपीनं लुटलं होतं. हीच मोडस ऑपरेंडी वापरत आरोपींनी अनेक शेकडो तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. हेही वाचा- लग्नासाठी कपलनं कुटुंबासह पोलिसांना आणलं नाकीनऊ; 10 तास पाण्याच्या टाकीवर ठिय्या आरोपीला अटक करून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने कोल्हापुरातील फसवणूक प्रकरणासह जुना राजवाडा आणि औरंगाबादच्या कन्नड पोलीस ठाण्यात 2015 साली दाखल झालेल्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. ठाणे पोलिसांनी आरोपीला कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात