मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

Kolhapur flood : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशनचे नियोजन करा : नीलम गोऱ्हे

Kolhapur flood : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशनचे नियोजन करा : नीलम गोऱ्हे

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. (kolhapur flood)

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. (kolhapur flood)

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. (kolhapur flood)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 10 मे : २०१९ पासून कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. (Kolhapur flood) 2019 आणि 2021 या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचे पुरामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासाठी उपाययोजना म्हणून राज्य सरकार आतापासूनच काळजी घेण्यास सुरूवात करत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) होत्या त्यांनी मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात पंपिंग स्टेशनचे नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात (rainy season) संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील याचा विचार होऊन यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

हे ही वाचा : Pune : पुणे विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न, आरोपींकडे बनावट तिकीटे, कट की आणखी दुसरं काही?

गोऱ्हे पुढे म्हणाल्या  कि, कोल्हापूर जिल्हा हा पूर प्रवण जिल्हा आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले साफसफाई करुन नैसर्गिरित्या पाणी जाण्याचा मार्ग मोकळे करावेत. या कामासाठी यंत्रणांनी प्राधान्य देऊन कालमर्यादा ठरविण्यात यावी. याबरोबच नाल्याच्या काठावर अवैध बांधकामे होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती उद्भवल्यास या कालावधीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद होणार नाही, याबाबत आतापासूनच नियोजन करावे, असे त्या म्हणाल्या.

पुरामुळे नुकसान झालेल्यांना शासनामार्फत देण्यात आलेल्या मदतीचाही आढावा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला. प्राप्त निधी संबंधित पूरग्रस्तांना देण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, मंडळांमार्फत चांगले उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर परिस्थतीत शेतकऱ्यांच्या जनावरांना दावणीला चारा देता येईल का याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

पुरामुळे रस्त्यांचे नुकसान होऊ नये, रस्त्यावर पाणी साचून राहू नये यासाठी अशा रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केल्या. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा,  पाऊसमान, आपत्तीमध्ये उपलब्ध साधन सामग्री, राधानगरी धरण दरवाजे याबाबत सविस्तर आढावा घेतला. राधानगरी धरण दरवाजाबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील धरणामध्ये  86 टीएमसी पाणी साठा होत असून पावसाळ्यात 24 तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित असल्याचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे यांनी सांगितले. तसेच धरण क्षेत्रातील पाऊस, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुका व ग्रामस्तरापर्यंत जलसंपदा विभागामार्फत त्वरीत पोहचविली जात असून ही माहिती  www.rtsfros.com/RTDAS  या संकेतस्थळावर दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शाश्वत विकास उदिष्टामध्ये जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव द्या

शाश्वत विकासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबींचा एकत्रित प्रस्ताव पाठण्याच्या सूचना करुन उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, प्रस्ताव तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मते जाणून घ्यावीत. समाजाभिमुख काम होण्यासाठी यामध्ये जलसंधारण, घनकचरा, वैद्यकीय कचरा, पाणीटंचाई, प्रदूषण, नागरी वने याबाबतचा समावेशही असावा. असे गोऱ्हे म्हणाल्या.

First published:

Tags: Kolhapur, Rain in kolhapur