मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

भर उन्हात काम करून थकली; विसावा घेण्यासाठी माडाखाली गेलेल्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी अंत

भर उन्हात काम करून थकली; विसावा घेण्यासाठी माडाखाली गेलेल्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी अंत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Farmer Woman Death in Kolhapur: दिवसभर कडक उन्हात काम करून थकल्याने, झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी माडाच्या झाडाखाली गेलेल्या एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

करवीर, 29 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिवसभर कडक उन्हात काम करून थकल्याने, झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली गेलेल्या एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला (farmer Woman death) आहे. ऐन दिपावली सणाच्या तोंडावर महिलेचा असा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे.

अलका अशोक पाटील असं मृत पावलेल्या 34 वर्षीय शेतकरी महिलेचं नाव आहे. मृत अलका या कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील बाचणी या  गावातील रहिवासी आहेत. गुरुवारी नेहमी प्रमाणे त्या आपल्या मानकांड शेतात शेती कामासाठी गेल्या होत्या. सकाळपासून त्यांनी आपल्या शेतात काम केलं. पण दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे काही वेळ विसावा घ्यावा, यासाठी अलका आपल्या शेतातील एका नारळाच्या झाडाखाली येऊन बसल्या. (farmer Woman sit under the coconut tree)

हेही वाचा-विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर रेप

दरम्यान, अचानक नारळाचा एक मोठा घड अलका यांच्या डोक्यात पडला (bunch of coconut falls on her head). या दुर्दैवी घटनेत अलका गंभीररित्या जखमी (Injured) झाल्या. या घटनेनंतर आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाच अलका यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नारळाचा घड डोक्यात पडून अलका याचं निधन झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.

हेही वाचा-जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं

ऐन दिपावली सणाच्या तोंडावर अशाप्रकारे अलका याचं दुर्दैवी निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांनी या घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Death, Kolhapur, Woman