Home /News /kolhapur /

VIDEO: 'बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या' म्हणत शेकडो बैलगाड्यांसह मोर्चा

VIDEO: 'बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या' म्हणत शेकडो बैलगाड्यांसह मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी बैलगाडी चालक-मालकांनी मोर्चा काढला.

कोल्हापूर, 11 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, (Kolhapur) सातारा, (Satara) सांगली (Sangli) या तिन्ही जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये बैलगाड्या पळविण्याच्या शर्यतींच (Bullock cart race) आयोजन केल जात. पण सरकारच्या नियमांमुळे या शर्यतींवर सध्या बंदी आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून लाखो रुपये किमतीचे बैल मालकांच्या गोठ्यातच बसून आहेत म्हणूनच शर्यतींना परवानगी द्यावी अशी मागणी करत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी चालक मालकांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादी मधून वगळाव आणि नियम, अटी घालून शर्यतींना परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी बैलगाडी मालकांनी केली. कोल्हापूरसह सीमाभागातल्या अनेक गावांमध्ये दरवर्षी बैलगाडी शर्यतीच आयोजन केलं जातं आणि या शर्यतींमध्ये हौशी बैल गाडी मालक सहभागी होत असतात. यंदाची स्कॉलरशिप परीक्षा रद्द, मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाचा निर्णय बैलगाडा शऱ्यतींवर बंदी घातल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. अनेक गावांत यात्रे दरम्यान मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होत असतात मात्र, बंदी असल्याने या होत नाहीयेत. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी बैलगाडा मालक आणि चालक यांच्याकडून वारंवार होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आज राज्यातील विविध भागांत मोठ्या संख्येने बैलगाड्या घेऊन चालक आणि मालक यांनी आपली मागणी मांडली. कोल्हापुरातच नाही तर अकोल्यातही बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. एकिकडे बैलगाडा शर्यतींना पुन्हा परवानगी देण्याची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे मात्र, प्राणी प्रेमी याला कडाडून विरोध करताना दिसत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Kolhapur

पुढील बातम्या