मुंबई, 11 ऑगस्ट : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाने (Education Department) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा (Scholarship Examination) न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने एक परिपत्रक सुद्धा काढले आहे. या परिपत्रकात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे कारण यात दिले आहे. मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेच्या कारणास्तव आपण मुंबई मनपा शाळांना आदेश देऊन परीक्षा होणार नसल्याचे आदेश दिले आहेत. परंतु हे आदेश खाजगी अनुदानित / विनाअनुदानित शाळांना लागू असल्याचा उल्लेख नाहीये. त्यामुळे मुंबईतील काही विद्यार्थी इ. 5 वी आणि इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत. विरोधकांच्या गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले, रात्रभर झोपू शकलो नाही… मात्र मनपा विद्यार्थी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव परीक्षेला बसणार नाहीत. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक पालक यांच्याकडून या बाबतीत विचारणा होत आहे. सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलून सर्वांसाठी सारखा न्याय व संधी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षख परिषदेने केली आहे. 8 वीच्या विद्यार्थांची शिक्षवृत्ती परीक्षा 12 ॲागस्ट रोजी राज्यभर होणार आहे. परंतु मुंबई महापालिकेने ही परिक्षा आपल्या विद्यार्थी आणि परिक्षा केंद्रावर रद्द केली आहे. परंतु राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येत असलेली ही शिष्यवृत्तीची परिक्षा यापूर्वी दोनदा पुढे ढकलली होती. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना आता ज्या विद्यार्थी गटाला या शिष्यवृत्तीची सगळ्याच जास्त गरज असते त्यांच वर्गाला या परिक्षेपासून दूर ठेवण्यात आले आहे. हे आदेश खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांसाठी नसल्याने महापालिकेच्या होतकरू विद्यार्थीवर मोठा अन्याय होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.