कोल्हापूर, 15 जुलै: महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाहीये. कोल्हापूर (Kolhapur) सोबतच सातारा (Satara) आणि सांगली (Sangli) या जिल्ह्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा सुद्धा जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने केंद्राची सुद्धा चिंता वाढली आहे. या संदर्भात आता केंद्रीय पथक कोल्हापूर शहरात दाखल झाले आहे. दिल्लीहून आलेलं केंद्रीय पथक आता कोल्हापूर शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. या दरम्यान दररोज किती टेस्टिंग होते, आरोग्य व्यवस्थेची स्थिती, ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची स्थिती या संदर्भात केंद्रीय पथक माहिती घेणार आहे. तसेच कोविड सेंटरलाही भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास; माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन केंद्रीय पथक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे. तेथील परिस्थिती आणि सुविधांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. यासोबतच लसीकरण कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच लसीकरण केंद्रांनाही भेट देतील. कोल्हापुरातील कोरोनाची स्थिती (14 जुलै 2021ची आकडेवारी) टेस्ट - 19,136 नवीन बाधितांची संख्या - 1696 डिस्चार्ज - 1632 मृत्यू - 18 जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्ण - 12810 रुग्ण बरे होण्याचा दर - 90.08 टक्के
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.