जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास; माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास; माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास; माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

Former MLA Madhukar Thakur died: रायगडमधील माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायगड, 15 जुलै : वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचे निधन झाले आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर ठाकूर हे अलिबाग (Alibaug) उरण (Uran) मतदारसंघाचे माजी आमदार होते. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. 2004 ते 2009 या काळात अलिबाग - उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव; एकाला प्लेअरचा Covid 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह कॉंग्रेसचे मधुकर ठाकुर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव करीत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी त्यावेळी शेकापचा अलीबाग मध्ये पराभव झाला होता. त्यानंतर ठाकुर यांचा राजकीय प्रवास अतिशय वेगवान होता. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विल्लसराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचे सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ठाकुर यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: raigad
  • First Published :
जाहिरात
जाहिरात