जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / कोल्हापुरात कौमार्य चाचणीचा संतापजनक प्रकार, नापास झाल्याचे सांगत मोडले दोघींचे marriage

कोल्हापुरात कौमार्य चाचणीचा संतापजनक प्रकार, नापास झाल्याचे सांगत मोडले दोघींचे marriage

कोल्हापुरात कौमार्य चाचणीचा संतापजनक प्रकार, नापास झाल्याचे सांगत मोडले दोघींचे marriage

अनिष्ट रुढींचा कहर: या तरुणी कौमार्य चाचणीत नापास झाल्यानंतर कंजारभाट समाजाची जात पंचायत बोलावण्यात आली. या जातपंचायतीत विवाह मोडण्याचा निर्णय दिल्यानंतर समाजाच्या पद्धतीनुसार बाभळीच्या झाडाची फांदी मोडून हा विवाह मोडण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 08 एप्रिल: कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात तरुणींची कौमार्य चाचणी (Virginity test) केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या दोन तरुणी चाचणीत नापास झाल्यानं त्यांचा विवाह कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीनं मोडीत काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Virginity test of two newly married girls in Kolhapur) आपल्या समाजातील अत्यंत विचित्र अशा कुप्रथांपैकी एक म्हणजे कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची प्रथा. लग्नापूर्वी किंवा विवाहाच्या पहिल्याच रात्री तरुणींची अशा प्रकारे कौमार्य चाचणी द्यावी लागते. या चाचणीत नापास झालेल्या तरुणींचा विवाह मोडला जातो. कोल्हापुरात नेमकाच असा एक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागातील नागरिकांमध्ये या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. बेळगावमध्ये दोन तरुणींचा विवाह दोन सख्ख्या भावांबरोबर झाला होता. या विवाहानंतर पहिल्या रात्री या दोन तरुणींनी कौमार्य चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे कौमार्य चाचणीमध्ये या दोन तरुणी नापास झाल्या, त्यानंतर या दोन तरुणींचा विवाह मोडण्यात आला. या तरुणी कौमार्य चाचणीत नापास झाल्यानंतर कंजारभाट समाजाची जात पंचायत बोलावण्यात आली. या जातपंचायतीत विवाह मोडण्याचा निर्णय दिल्यानंतर समाजाच्या पद्धतीनुसार बाभळीच्या झाडाची फांदी मोडून हा विवाह मोडण्यात आला. वाचा - ‘कोरोनामुळे कमी, लॉकडाऊनमुळे मरू…’, पुणेकर व्यापाऱ्यांकडून निर्बंधांचा निषेध हा सर्व प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला समजल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या दोन तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासत घेत पोलिसांत तक्रार देण्यासाठी राजी केलं. त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाणं गाठून दोन्ही नवरदेवांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या दोघांपैकी एकजण भारतीय सैन्य दलात आहे. त्यानं पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूर मध्येच आहेत. सासरच्या लोकांनी या दोघींना नांदवणार नसल्याचं जात पंचायतीमार्फत सांगितलं आहे. वाचा - आठवड्याला 40 लाख डोस द्या, 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरू करा; टोपेंची मागणी कौमार्य चाचणीच्या या आणखी एका प्रकारानंतर कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभाग परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या अनिष्ठ प्रथांना बळी पडून तरुणींवर कौमार्य चाचणीसारखे अत्याचार करणाऱ्या कुटुंबांवर कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर अंनिसच्या वतीने गीता हसूरकर यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात