मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्याची शौर्यगाथा, पुराच्या पाण्यातून पोहत जात बजावलं कर्तव्य, पाहा Video

महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्याची शौर्यगाथा, पुराच्या पाण्यातून पोहत जात बजावलं कर्तव्य, पाहा Video

हर्ष विजय सुदर्शने या वीज कर्मचाऱ्यानं  पुराच्या पाण्यातून (Flood Water) पोहत जात नेसरी घटप्रभा नदीलगतच्या 12 गावांचा (12 villages) खंडित झालेला वीजपुरवठा (Electricity) सुरळीत केला.

कोल्हापूर, 25 जुलै: आपल्या कामाविषय़ी खरी तळमळ असेल, तर कुठलेही अडथळे पार करून ते काम तडीस नेणारी माणसं नेहमीच कौतुकाचा विषय ठरतात. अशीच कौतुकास्पद केलीय कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील महावितरणच्या (Mahavitaran) एका कर्मचाऱ्यानं. (Employee) हर्ष विजय सुदर्शने या वीज कर्मचाऱ्यानं  पुराच्या पाण्यातून (Flood Water) पोहत जात नेसरी घटप्रभा नदीलगतच्या 12 गावांचा (12 villages) खंडित झालेला वीजपुरवठा (Electricity) सुरळीत केला.

गडहिंग्लज तालुक्यातील तेगिनहाळ गावचे हर्षद सुदर्शने हे महावितरणच्या नेसरीमधील कार्यालयात टेक्शिनियश म्हणून काम करतात. हर्षद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटप्रभा नदीचा पूर पोहून पार केला आणि 12 गावांचा खंडित झालेला वीजप्रवाह सुरळीत करण्याची कामगिरी त्यांनी फत्ते केली.

अशी केली कामगिरी

हडलगे, डोणेवाडी, सांबरे, कुमरी, काळामवाडी, येमेहट्टी, तावरेवाडी, सरोळी, कानडेवाडी, अर्जुनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी आदी गावांचा वीज पुरवठा तीन-चार दिवसांपासून खंडित झाला होता.  महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी १२ गावांना अंधारमुक्त करण्याबरोबरच नळपाणी पुरवठा योजनाचाही विद्युत पुरवठा सुरळीत केला.

साहाय्यक अभियंता शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षद सुदर्शने, शाम देसाई, प्रशांत देसाई, भैरू देसाई, सचिन पाटील, मैनोदीन शेख, आशेय बागडी, प्रकाश पोटे, फिरोज बागवान, श्रीकांत मनगुतकर, स्वप्निल गावडे  यांनी धाडसाने तारेवाडी-हडलगे नवीन पुलाजवळ महापुरातील पोल वरून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

हे वाचा -Update News: वरळी लिफ्ट कोसळल्याप्रकरणी पोलिसांची पहिली कारवाई

तुडुंब भरून वाहणा-या नदीच्या पात्रात हर्षदने कंबरेला दोरी बांधून महापुरात स्वतःला झोकून दिले आणि सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. पोलच्या ओढणीवरून चढून खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करून १२ गावे अंधारातून मुक्त केली.  हर्षद खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करत असतानाचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर झपाट्याने  व्हायरल झाला आहे. महावितरणच्या जिगरबाज हर्षदचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Kolhapur, Maharashtra, Mumbai, Rain in kolhapur