मुंबई, 25 जुलै: वरळी (Worli) भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मोठी दुर्घटना घडली. इमारतीची लिफ्ट कोसळून (building lift collapse) 5 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. वरळीत इमारतीची लिफ्ट कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कंत्राटदार आणि सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. कलम 304 (2) अन्वये एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 people died, one injured after a lift collapsed at an under-constructed building in Worli, Mumbai. Injured have been shifted to the hospital: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)#Maharashtra pic.twitter.com/6yMAEopgNb
— ANI (@ANI) July 24, 2021
बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ही मोठी दुर्घटना घडली. इमारतीची लिफ्ट कोसळून (building lift collapse) 5 जणांचा मृत्यू झाला होती. वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली.अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra Environment Minister Aditya Thackeray reaches the site where 4 people died after a lift collapsed at an under-constructed building in Worli, Mumbai
— ANI (@ANI) July 24, 2021
"Prima facie, lift collapsed due to overloading. One feared to be trapped. Rescue ops underway," says Aditya Thackeray pic.twitter.com/jRubZEwZLE
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. “प्रथमदर्शनी लिफ्ट ओव्हरलोडिंगमुळे कोसळल्याचे कळते. या ठिकाणी बचावकार्य अद्याप सुरु आहे,” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.