नवी दिल्ली 17 नोव्हेंबर: लडाखमध्ये चीन सोबतचा तणाव कायम आहे (India-China Ladakh Border Tension). भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना रोखून धरण्यात यश मिळवलं असून त्यांच्या मुजोरीला मोठा दणका दिला आहे. हा तणाव कमी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृतपणे अजुन काहीही सांगितलं जात नाही. चीनचं संकट कायम असताना लष्करापुढे आता दुसरं संकट निर्माण झालं आहे. हे संकट नैसर्गिक असून त्याचा लष्कर समर्थपणे मुकाबलाही करत आहे. लडाख आणि पसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.
या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो. त्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांची कसोटी लागत असते. अशा वातावरणात काम करणं हे सर्वात कठिण काम असतं. त्यामुळे लडाखमध्ये 15 दिवसांत सैनिकांची ड्युटी बदलली जात आहे.
या सैनिकांसाठी खास पोशाख आणि स्मार्ट कॅपही तयार करण्यात आली आहे. सियाचीनमध्ये यापेक्षाही प्रतिकूल वातावरणात काम करण्याचा अनुभव भारतीय सैनिकांना आहे. त्या अनुभवाचा फायदाही आता लडाखमध्ये होतो आहे.
भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या 8व्या फेरीत यासंबधीच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य होतं त्याच ठिकाणी पुन्हा सैनिक परतणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.
जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारामध्ये भारत का नाही झाला सामील?
कुठल्याही परिस्थित दबावाला बळी पडणार नाही असं भारताने दाखवून दिलं आहे. एवढच नाही तर आक्रमकपणे सीमेवर सज्जताही सुरू केली होती. त्याचामोठा दणका चीनला बसला आहे. भारताशी संघर्ष परवडणारा नाही हे लक्षात आल्याने चीनने आपलं सैन्य मागे हटवण्याची तयारी दाखवली. 6 नोव्हेंबरला चुशूल इथं दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात तोडग्यावर सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. तीन टप्प्यात यासंबंधात कार्यवाही होणार आहे.
India China Border : लडाख सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी No Man's Land महत्त्वाचा
पहिल्या टप्प्यात पॅगोंग लेक परिसरातून टँक आणि सैन्यिक आपल्या पूर्वीच्या जागी जातील. दुसऱ्या टप्प्यात दररोज 30 टक्के सैनिक या भागातून हटविण्यात येतील. ही प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर चिनी सैनिक फिंगर 8 जवळ परतणार आहे. तर भारताचे सैनिक पूर्वीच्या धान सिंह थापा पोस्टवर परत जाणार आहे.