नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : पूर्व लडाखमध्ये (Ladakh) भारत आणि चीन (India China Border dispute) दरम्यान सुरू असलेल्या सीमा वाद सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीपूर्वी सीमेवरचा तणाव निवळेल, असं लष्करी सूत्रांचं म्हणणं आहे. हे यश मिळालं आहे दोन्ही देशांनी मान्य केलेल्या थ्री स्टेप प्लॅनमुळे. या प्लॅनअंतर्गत दोन्ही देशांचे सैनिक एप्रिल-मे मध्ये होते त्या ठिकाणी परत जातील. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी पँगाँग लेकच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील वादग्रस्त फिंगर एरियाचं ‘नो मॅन्स लॅंड’मध्ये तात्पुरते रूपांतर केलं जाऊ शकतं. हा No Man's Land च भारत-चीन सीमेवरचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
सूत्रांनी सांगितले की टप्प्याटप्प्याने डिएस्केलेशनच्या प्रस्तावाचा महत्त्वपूर्ण बाबींखाली फिंगर 4 ते फिंगर 8 पर्यंतचा परिसर हा नॉन पेट्रोलिंग झोन करण्याचा विचार केला जात आहे. तसेच या संदर्भात भारत सरकार किंवा भारतीय सैन्याकडून कुठलीही माहिती मिळाली नाही. तसेच चीन कडून सुद्धा कुठलेही विधान आलेले नाही.
6 नोव्हेंबरला झाली चर्चेची आठवी फेरी
6 नोव्हेंबरला लडाखच्या चुशूलमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात चर्चेची आठवी फेरी झाली. या दोन्ही देशांनी तीन स्टेप या योजनेवर सहमती दर्शवली आहे. अहवालानुसार दोन्ही देश हे त्यांचे सैन्य काढून टाकण्यासाठी तयार आहेत कारण सध्या पूर्व लडाखमधील हिमालयाच्या शिखरांवर जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तिथे 15 ते 16 हजार फूट उंचीवर तापमान मायनस 45 डिग्री पर्यंत जाते त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांना अडचणी येऊ शकतात.
या आहेत त्या 3 स्टेप
-पहिल्या टप्प्यात पेंगाँग लेकचा परिसर पहिल्या आठवड्यात रिकामा होईल. तसेच तेथील सैनिक परत पाठवले जातील ही प्रक्रिया तीन दिवस सुरू राहील.
-दुसऱ्या टप्प्यात दोन्ही सैन्यांना पेंगाँग परिसरातून 30 टक्के सैनिक काढून घ्यायचे आहेत. त्याचवेळेस चिनी सैन्य फिंगर 8 मध्ये परत येईल आणि भारतीय सैन्य धानसिंह थापा पोस्टवर परत येईल.
-त्याच वेळी तिसऱ्या टप्प्यात भारत आणि चीन आपले सैन्य पेंगाँग लेक परिसराच्या दक्षिणेकडील भागातून काढून घेतील. त्यावेळी तणावाने व्यापलेल्या चुशूल, रेजांग टेकड्यांना ही रिकामे केलं जाईल. तसेच यावेळी दोन्ही सैन्य या हालचालींवर देखरेखसुद्धा करतील. आणि यावरती दोन्ही सैन्यांचे एकमत सुद्धा झालेले आहे.
हा वाद कोणत्या क्षेत्रात आहे ?
लडाखचा फिंगर 8 आणि फिंगर 4 मध्ये चीन सोबत हा वाद आहे. या भागात चिनी सैन्य आठ किलोमीटर पर्यंत भारताच्या सीमेत घुसलं होतं. भारताच्या दृष्टिने ही सीमेतील घुसखोरी आहे.त्यामुळे तणाव व भांडणे होत आहेत. फिंगर 4 आणि 8 च्या मधल्या भागात दोन्ही सैन्य गस्त घालत असतात. तेथील तलावाच्या काठावरील 1400 फूट उंच डोंगराच्या क्षेत्राला 'फिंगर एरिया' या म्हणून ओळखलं जातं
एप्रिलपासून सुरू आहे हा तणाव
पूर्व लडाखच्या पेंगाँग तलावाच्या भागात एप्रिलपासून हा तणाव सुरू आहे. यावेळी चिनी सैन्याने अनेक भारतीय पेट्रोलिंग पॉईंट हस्तगत परंतु भारतीय सैनिकांनी वेळेवर त्यांना प्रत्युत्तर दिले. 15 जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांशी झुंज झाली. ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले. चीनचे 43 सैनिक आपण ठार केले. परंतु चीनने अधिकृत आकडेवारी फक्त पाच सैनिक ठार झाल्याची नोंद दाखवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Ladakh