मराठी बातम्या /बातम्या /india-china /

चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

राफेल विमानं तैनात झाल्यानंतर चीनशी दोन हात करणं सोपं जाणार आहे

राफेल विमानं तैनात झाल्यानंतर चीनशी दोन हात करणं सोपं जाणार आहे

राफेल विमानं तैनात झाल्यानंतर चीनशी दोन हात करणं सोपं जाणार आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 जुलै : भारतीय वायुसेनाने सोमवारी राफेल विमानाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वायुसेनाने सांगितले की – 5 राफेल विमानं जुलै 2020 पर्यंत भारतात येणं अपेक्षित आहे. ही विमानं 29 जुलै रोजी वातावरणाच्या बदलानुसार वायु सेना स्टेशन अंबालामध्ये सहभागी केलं जाईल.

फायन इंडक्शन कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी दुपारी होईल. भारतीय वायु सेनेकडून सांगितले गेले आहे की वायुसेनाचे एअरक्रुझ आणि ग्राऊंड क्रु यांना अधिकतर शस्त्रे प्रणालीसह प्रशिक्षण दिलं आहे. आता पुर्णपणे ते उड्डाण करण्यास सक्षम आहे. वायुसेनाने सांगितले की आगमनानंतर विमानाच्या परिचालनावर लवकरात लवकर लक्ष केंद्रीत केलं जाईल.

हे वाचा-PM मोदींचा षट्कार; चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रुपये पाण्यात

यापूर्वी आलेल्या माहितीनुसार भारतीय वायुसेनाचे वरिष्ठ कमांडर बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात देशाची वायु रक्षा प्रणालीची समीक्षा करतील. यामध्ये चीनसोबत झालेल्या वादानंतर लडाख क्षेत्रात राफेल लडाऊ विमान तैनात करण्याबाबत चर्चा केली जाईल. सैन्य सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमांडरांच्या लडाख क्षेत्रात या महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 5 राफेल विमानं पहिल्या टप्प्यात तैनात करण्याबाबत विशेष करुन चर्चा करण्याची शक्यता आहे.

हे वाचा-चीनवर दुहेरी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला

वायुसेनेच्या पूर्व लडाख भागात गेल्या काही आठवड्यांपासून रात्रीच्या वेळी लढाऊ विमानं घिरट्या घालत आहेत. परिणामी चीनला संदेश द्यायचं आहे की- या पर्वतीय भागात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ते तयार आहे.

First published:

Tags: Air india