जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / कोरोनानंतर चीनवर अस्मानी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला

कोरोनानंतर चीनवर अस्मानी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला

कोरोनानंतर चीनवर अस्मानी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला

आधीच भारत अमेरिकेने घेराव घातला असताना आता चीनसमोर अस्मानी संकट आलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

पेइचिंग, 19 जुलै : कोरोनामुळे आधीच चीनची परिस्थिती खराब झाली आहे. दुसरीकडे भारत आणि अमेरिका चीनला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता चीनसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. चीनमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे येथे आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच चीनच्या च्यांगशी प्रातांत पोयांगहू खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील पुराच्या परिस्थितीमुळे 52.1 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. यामध्ये 4 लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. यादरम्यान अनहुई प्रांतात पुराच्या पाणीचा दबाव कमी करण्यासाठी चीनचा एक पुल उडविण्यात आला आहे. पाण्याचा दबाव कमी करण्यासाठी पूल उडवला चीनच्या सरकारी मीडिया सीसीटीव्ही रिपोर्टनुसार रविवारी नदीमध्ये बेसीनमध्ये पुरानंतर दबाव कमी करण्यासाठी यांगत्जी नदीची सहायक चुही नदीवरील बांधलेल्या जगातील सर्वात मोठ्या पुलाला विस्फोटकांनी उडवून देण्यात आलं आहे. या वर्षी मुसळधार पावसामुळे दक्षिणी चीनचे यांगत्जी सह अनेक नदींमध्ये पाण्याची पातळी धोकादायक निशाण्यापासून वर येत आहे. दरम्यान चीनमधून होणाऱ्या थेट गुंतवणूकीला सरकार प्रतिबंध करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि SEBI यावर चर्चा करत असून सरकार लवकरच नवे नियम तयार करणार आहे. या आधी सरकारने 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. त्याचबरोबर सरकारी प्रकल्पांमधून चिनी कंपन्यांना हद्दपार केलं होतं. हा निर्णय झाला तर चिनी कंपन्यांना भारतासारखी मोठी बाजारपेठ गमविण्याची वेळ येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात