सातारा 27 जून: भारताच्या चीनसोबत सुरु असलेल्या सीमावादावरून (india china border dispute )काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) दररोज केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. सरकारचं परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. भारत चीन प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नाही. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही असं त्यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पवार म्हणाले, भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही. ते पुढे म्हणाले, 1993 साली देशाचा संरक्षण मंत्री असताना मी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी काही सीमांवर बंदुकीचा किवा शस्त्राचा वापर करायचा नाही असा करार करायची चर्चा चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी केली होती. त्यावर पुढील काळात नरसिंहराव यांनी पुन्हा चीन दौरा करून तो करार अमलात आणला. VIDEO: चीनच्या सीमेजवळ भारताची लढाऊ विमाने तैनात, लष्कराने सुरू केला युद्धसराव दरम्यान, सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला सरकारकडून पूर्ण निर्णय घेण्याची सूट देण्यात आली आहे. भारत चीनच्या कोणत्याही हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. यासाठी सीमेवरही मोठ्या संख्येने सैन्य पाठवले जात आहे. अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे.
भारत चीन प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते.#सातारा_पत्रकार_परिषद
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 27, 2020
चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने (Indian Air force) लेह-लडाखमध्ये (leh-Ladakh) संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे. या युद्धाभ्यासात सुखोई 30MKI, चिनूक MI 17, या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. या भागातली भौगोलिक परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव करणे सुरू आहे. संपादन- अजय कौटिकवार