Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /india-china /

राजीव गांधींचा उल्लेख करीत परराष्ट्र मंत्र्यांनी केलं चीनचं कौतुक

राजीव गांधींचा उल्लेख करीत परराष्ट्र मंत्र्यांनी केलं चीनचं कौतुक

चीनची आर्थिक वाढ भारताहून बरीच जास्त आहे.

चीनची आर्थिक वाढ भारताहून बरीच जास्त आहे.

चीनची आर्थिक वाढ भारताहून बरीच जास्त आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 21 जुलै : भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादात भारताचे परराष्ट्रमंत्री मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आहे. परराष्ट्र मंत्री (Foreign Minister) जयशंकर यांनी चीनचं कौतुक करीत म्हटलं की – चीनची आर्थिक वाढ भारताहून बरीच जास्त आहे. गेल्या काही दशकात चीनमध्ये ज्या प्रकारे आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणा झाली आहे, त्यासाठी त्यांना श्रेय द्यायला हवे.

परराष्ट्र मंत्री यांनी CNBC-TV18 च्या एका कार्यक्रमात सांगितले की – 32 वर्षांपूर्वी 1988 मध्ये जेव्हा तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनचा दौरा केला होता, तेव्हा दोन्ही देशांची अर्थव्यवस्था जवळपास सारखीच होती. त्यांनी तुलना करीत सांगितले की तेव्हापासून आतापर्यंत चीनची अर्थव्यवस्थाने वेगाने प्रगती केली आहे.

हे वाचा-चीनविरुद्ध लष्कराकडे आता तिसरा डोळा, ‘भारत’ ठेवणार ड्रॅगनवर करडी नजर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या शेजारील देशांसोबत सुरू असलेल्या गुंतागुत संबंधाचा स्वीकार केला आणि म्हणाले की देशांमधील संबंध डोमॅस्टिक पॉलिटिक्सने प्रेरित आहेत. भारताला आपल्या शेजाऱ्यांसह संरचनात्मक संबंध तयार करण्याची आवश्यकता आहे. मजबूत संरचनात्मक संबंधातूनच राजकीय संबंधांवरील परिणाम होऊ देऊ नये.

हे वाचा-चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

चीनने चार दशकांमध्ये केला परिणामकारक आर्थिक रेकॉर्ड(impressive economic record)

परराष्ट्र मंत्री म्हणाले – चीनने चार दशकांमध्ये एक परिणामकारक आर्थिक रेकॉर्ड केला आहे. तर भारत याबाबत कमी राहिला. जलद गतीने पुढे जाणे आणि सुधारणा करणे हे भारतासमोरील मोठं आव्हान आहे.

First published:

Tags: S. Jayshankar