इंदूर, 21 जुलै : भारत-चीन सीमा वादानंतर देशभरात चीनचा विरोध केला जात आहे. भारत सरकारनेही विविध प्रकारे चीनला घेराव घातला आहे. तर सर्वसामान्यांनीही चीनच्या वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी तर आपल्या घराच्या खिडकीतून चीनच्या कंपनीचा टिव्ही फेकून दिल्याचे वृत्तही समोर आले होते. अशातच इंदूरमधील हॉटेलबाहेरील एक पुणेरी स्टाईल बॅनर सध्या खूप चर्चेत आहे.
येथील एक ढाब्याचा मालक चीनविरोधात आपला राग व्यक्त करण्याच्या अनोख्या प्रकारामुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या ढाब्यासमोर मोठा बॅनर लावला आहे. तो वाचून लोकांनी त्याचं कौतुकही केलं आहे.
हे वाचा-चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात
चीनविरोधात आक्रोश
इंदूरच्या मालवा मिल परिसरातील एका ढाब्याच्या बाहेर एक बॅनर लावला आहे. यावर लिहिले आहे – परदेशी जातीचे कुत्रे आणि चिनी माणसांना प्रवेश नाही. भारत-चीन विवादानंतर देशातील प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारे आपला आक्रोश व्यक्त करीत आहे.
हे वाचा-चीनवर दुहेरी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला
इतकंच नाही तर या ढाब्याच्या मालकाने चीयनीज फूडमधील मंचुरिअन न्युडल्सवरही पूर्णपणे बंदी आणली आहे. ढाब्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार- हा बॅनर हॉटेल मालकाने चीनविरोधातील राग व्यक्त करण्यासाठी लावला आहे. इतकच नाही तर ढाब्यात सैनिकांसाठी मोफत जेवणाची आणि पार्सलची सुविधाही उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.