नवी दिल्ली 26 जून: चीन (China) सोबत सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर (India China Border Dispute) लष्कराने (Indian Army) मोठा निर्णय घेतला आहे. चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने (Indian Air force) लेह-लडाखमध्ये (leh-Ladakh) संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे.
या युद्धाभ्यासात सुखोई 30MKI, चिनूक MI 17, या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. या भागातली भौगोलि परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव करणे सुरू आहे.
या आधीच भारताने या भागात लढाऊ विमाने तैनात केली असून लष्कराच्या जास्त तुकड्याही या भागात तैनात केल्या आहेत. सध्या परिस्थिती तणावाची असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुत्सद्देगिरी व रणनीतीसाठी गलवान खोऱ्यात भ्याड धाडस केल्यानंतर चीन जैविक हल्ला करू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची भूमिका आधीच अनुत्तरणीय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली असलेला चीन इतर भारतविरोधी देशांतून किंवा दहशतवाद्यांमार्फत थेट जैवीक हल्ला करू शकतो.
चीनच विकतंय #BoycottChina प्रोडक्ट? व्हायरल होणाऱ्या 'त्या' बातमीचं FACT CHECK
दरम्यान, जैविक हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडे पुरेसे संसाधन असल्याचं रासायनिक आणि जैविक जोखमींवर संशोधन करणार्या ग्वाल्हेर-आधारित प्रयोगशाळेतील (डीआरडीई) अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भारत सध्या शेजारच्या देशाच्या अर्थात चीन आणि पाकिस्तान भूमिकेमुळे त्रस्त आहे. तर मुत्सद्दी व सैनिकी घेरावामुळे चीन चक्रावला आहे. सीमेवरही पाकिस्तान गोळीबार करीत आहे. नेपाळची वृत्तीही चांगली नाही. एका वरिष्ठ लष्करी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून चीन जैविक हल्ल्यासारखे कृत्य करू शकतो.
#WATCH Ladakh: Indian Air Force aircraft carrying out sorties in Leh. The air activity has gone up in the region after the stand-off with China on the Line of Actual Control (LAC) there. pic.twitter.com/6L0Bqn3hTY
— ANI (@ANI) June 26, 2020
अलीकडेच लष्कराने दहशतवाद्यांसाठी शस्त्रे बाळगणारे ड्रोन पाडले. ड्रोनद्वारे जैविक हल्ला देखील शक्य आहे. अशा हल्ल्याची तिव्रता सुरूवातीला जाणवत नाही. हल्लाही काही काळानंतर आढळून येतो आणि नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.
IndiaChinaBorderTension : 'ड्रॅगन'नं दिला धोका, लडाखच्या सीमेवर पुन्हा नवी खेळी
ग्वाल्हेर येथील डीआरडीईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय लष्कर अशा प्रकारच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे. डीआरडीओच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी विभक्त रासायनिक जैविक युद्धविधान सूट, विशेष मास्क आदी सारखी विशेष उपकरणे तयार केली आहेत. कोणते जवान वापर करीत आहेत. त्यांना वेळोवेळी विशेष प्रशिक्षण देखील दिले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china border, Indian army