जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / मोदी सरकारच्या ‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस

मोदी सरकारच्या ‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस

मोदी सरकारच्या ‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस

जगभरातील उद्योग क्षेत्रात हातपाय परसलेल्या चीनला आता मोठा फटका सहन करावा लागणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जुलै : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी कामं ठप्प झाल्याचे वृत्त समोर येत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. देशातील लघु उद्योजकांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या ते चांगली कमाई करीत असल्याचे चित्र आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अमेझॉनवरील सूचीबद्ध भारताचे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आणि ब्रँड्स यांनी जगभरात 2 अरब डॉलरचे उत्पादन निर्यात केले आहेत. यामुळे देशाच्या निर्यात व्यापारालाही सहाय्य मिळत आहे. भारतीय कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचा निर्यात अमेझॉनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामअंतर्गत केला आहे. हे वाचा- चीनवर दुहेरी संकट; जगातील सर्वात मोठा पूल विस्फोटकांनी उडवला लोकल ब्रँड्स ग्लोबल करण्यासाठी कंपनीची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मेक इन इंडिया आणि भारतीय उत्पादनाची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावर अमेरिकेची ई-कॉमर्स कंरनी अमेझॉनचं म्हणणं आहे की त्यांनी भारतातील एमएसएमई क्षेत्र आणि ब्रँड्सची निर्यात वाढविण्यासाठी मदत करीत आहेत. हे वाचा-  PM मोदींचा षट्कार; चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रुपये पाण्यात अमेझ़ॉन इंडियाचे प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी सांगितले की – कंपनीच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना विश्वस्तरावर पोहोचविण्यात आलं आहे. यामुळे स्थानिक ब्रँड्सना ग्लोबल बनविण्यासाठी मोठी मदत होत आहे. अमित अग्रवाल यावेळी म्हणाले की – जीएसपीअंतर्गत निर्यात 1 अरब डॉलरपर्यंत पोहोचविण्यासाठी 3 वर्षे लागतील. आज या प्रोग्राममध्ये 60000 निर्यातक जोडले गेले आहेत. कंपनीला अपेक्षा आहे की 2025 पर्यंत या प्रोग्राममुळे भारतातील लघु उद्योजक आणि ब्रँडचा निर्यात 10 अरब डॉलरपर्यंत पोहोचेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात