Home /News /india-china /

New Uniform for Indian Army : भारतीय सैन्यांच्या तुलनेत चिनी सैनिक अधिक अत्याधुनिक! वाचा एका सैनिकाचा खर्च

New Uniform for Indian Army : भारतीय सैन्यांच्या तुलनेत चिनी सैनिक अधिक अत्याधुनिक! वाचा एका सैनिकाचा खर्च

New Uniform for Indian Army : भारतीय लष्कराला एक नवीन गणवेश मिळणार आहे, जो हलका आणि वेगवेगळ्या ऋतूंना अनुकूल असेल. हा डिजीटल धर्तीवर तयार करण्यात आला आहे. पण, अजूनही आपल्या सैनिकांना आधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज करण्याच्या दिशेने लष्कराला खूप काही करायचे आहे. आपल्या तलनेत चीनी सैन्य कुठे आहे? जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 2 डिसेंबर : नवीन वर्षात 13 लाख भारतीय सैनिकांना डिजीटल पॅटर्नपासून बनवलेला नवीन गणवेश मिळेल, जो हलका, चांगला आणि हवामानाचा सामना करण्यास सक्षम असेल. भारतीय लष्कर आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. येत्या काही वर्षांत भारतीय सैनिकांनी परिधान केलेले लढाऊ कपडे आणि उपकरणे आधुनिक करण्याचा त्यांचा मानस आहे. आपण या कामात अजूनही चीनच्या मागे आहोत. चीनने आपल्या सैनिकांनी परिधान केलेल्या लढाऊ पोशाखाकडे आणि उपकरणांकडे बरेच लक्ष दिलं आहे. भारतात या दिशेने एक प्रकल्प कार्यरत आहे, ज्यामुळे भारतीय सैनिकांच्या लढाऊ गणवेशात आणि त्यासोबत वापरल्या जाणार्‍या उपकरणांमध्ये अधिक चांगली स्थिती येईल. सध्या भारतीय सैनिक बुलेटप्रूफ जॅकेट, हेवी लेदर शूज आणि स्टँडर्ड हेडगियरसह गणवेश घालतात. आतापर्यंत रायफल सोबत असायची पण आता ती बदलली जात आहे. त्याची जागा SIG सोलर रायफल्सने घेतली आहे. आता भारताला खरा धोका इतर कोणत्याही देशाकडून नसून चीनकडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनचे सैन्य केवळ सीमेवर उभं आहे असं नाही, तर गेल्या वर्षभरात त्यांनी सीमेच्या पलीकडे आपली तयारी सातत्याने सुधारली आहे. चीनने केवळ लष्कराचे आधुनिकीकरणच केले नाही, तर आपल्या सैनिकांच्या दैनंदिन उपकरणांवरही बरेच काम केले आहे. मात्र, सैनिकांच्या वैयक्तिक उपकरणांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. चिनी सैनिक हेल्मेटपासून बूटपर्यंत वरपासून खालपर्यंत आत्याधुनिक अॅक्सेसरीज वापरतात. त्यात त्यांचा गणवेश, हातात रायफल आणि महागडे हेल्मेटही आहे. पण अमेरिकन सैन्याच्या तुलनेत हे अतिशय हलक्या दर्जाचे आणि कमी किमतीचं मानलं जातं. China birth rate | चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण? चिनी सैनिकांच्या सामानाचा दर्जा कसा आहे? चीनमधील आघाडीच्या वृत्तपत्र पीपल्स डेलीने काही काळापूर्वी ही माहिती दिली होती. या सर्व अॅक्सेसरीज स्वतः चीनमध्ये विकसित केल्या आहेत. मात्र, चीन जेवढा पैसा आपल्या आर्मीवर खर्च करतो, तेवढा तो आपल्या सैनिकांवर करत नाही, असा प्रश्न आजही जगात उपस्थित होतो. उलट, त्याच्या सैनिकांची साधने आणि उपकरणे ज्या दर्जाची असावीत तशी नाहीत. सध्या हे खरे असले तरी सैनिकांच्या वैयक्तिक सामानाच्या बाबतीत चीनला जगातील सर्वोत्तम तीन सैन्यात ठेवले जाते. जेव्हा एखादा चिनी सैनिक तयार होत असोत, तेव्हा त्याने ही उपकरणे परिधान करून घेऊन जाणे आवश्यक आहे. यात एक खास हेल्मेट, बॅकपॅक आणि फर्स्ट-एंड किट देखील आहे. प्रत्येक चिनी सैनिकाकडे 11 वस्तू असतात प्रत्येक चिनी सैनिकाला गणवेशासह 11 वैयक्तिक वस्तूंसह तयार राहावे लागते. भारतीय चलनानुसार पाहिल्यास, स्वयंचलित रायफल, गणवेश आणि इतर उपकरणे असलेल्या चिनी सैनिकाची एकूण किंमत 81,549 रुपये आहे. इथं हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की 1 चीनी युआन म्हणजे 10.66 रुपये. चीन आपल्या लष्करावर पुरेसा पैसा खर्च करतो डोक्यापासून पायापर्यंत चिनी सैन्याकडे कोणती उपकरणे असतात? आणि त्या प्रत्येकाची किंमत भारतीय चलनानुसार किती आहे? हे आपण पाहुन घेऊ. वेस्टर्न रिसर्च इन्स्टिट्यूटने एका संशोधनानंतर सांगितले की, 2008 नंतर चीन जगातील दुसरा देश बनला आहे जो आपल्या सैन्यावर सर्वात जास्त पैसा खर्च करतो. मात्र, अमेरिकन प्रसारमाध्यमे अनेक वर्षांपासून या दाव्याची खिल्ली उडवत आहेत. अमेरिका जास्त खर्च करते असे मानले जाते की अमेरिका आपल्या सैन्यावर चीनपेक्षा पाचपट जास्त खर्च करते. तर आपल्या एका सैनिकाच्या वैयक्तिक सामानावर चीनपेक्षा 10 पट जास्त खर्च करते. चिनी सैनिकाच्या वैयक्तिक सामानाची किंमत एका चांगल्या आयफोनच्या किमतीएवढी आहे, असे म्हटले जात असले तरी, अमेरिकन सैनिकाच्या वैयक्तिक वस्तूंची किंमत एका मध्यम कारच्या बरोबरीची आहे, ज्यामध्ये 20 चांगले आयफोन येऊ शकतात. धोक्याची घंटा ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट; चीनमध्ये Corona returns, अनेक ठिकाणी Lockdown चीनी सैनिकांच्या वैयक्तिक वस्तू हेल्मेट - या विशेष हेल्मेटची किंमत 16795 रुपये आहे. याला QGF02 हेल्मेट म्हणतात, जे चीनने 1994 मध्ये विकसित केले होते. यामध्ये केव्हलर मटेरियल वापरण्यात आले आहे. हे वजनाने हलके असून यावर बॉम्बचा परिणाम होत नाही. हे हेल्मेट यूएस आर्मीच्या PASGT हेल्मेटपेक्षा खूपच चांगले असल्याचा चीनच्या लष्कराचा दावा आहे. मात्र, अमेरिकन मीडियाने या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांच्या मते, त्यांच्यापेक्षा चिनी सैनिकांचे हेल्मेट कमी दर्जाचे आहे. अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक सिस्टिम असलेल्या हेल्मेटशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. कॅमफ्लाज टॅक्टिकल वेस्ट - याची किंमत 2976 रुपये आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन आपल्या सैनिकांना चिलखत घालत नाही, जे सर्वात महत्त्वाचे आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, चीन जगातील सर्वात स्वस्त बॉडी आर्मर विकतो. परंतु, तेथील तज्ञ सैनिकांना बॉडी आर्मर घालण्यास टाळाटाळ करतात. गॅसमास्क - याची किंमत 4040 रुपये आहे. हे युद्धभूमीवर धूर, धूळ आणि रासायनिक धुरापासून त्यांचे संरक्षण करते.

  400 वर्षांनी मिळालं बार्बाडोसला स्वातंत्र्य, ब्रिटनच्या जोखडातून झाला मुक्त

  A95 रायफलची सर्वोच्च किंमत याव्यतिरिक्त इतर उपकरणांमध्ये रेनकोट (1700), एक किटली (1754), प्रथमोपचार किट (532), एक मजबूत वुडलँड कॅमफ्लाज गणवेश (1667), एक बॅकपॅक (1967), एक बोवेन बेल्ट (1010) आणि एक कॉम्बॅट बूट (3401) आहे. यामध्ये त्यांच्याकडील ए95 रायफलची सर्वात जास्त किंमत आहे, ज्याची किंमत 45,707 रुपये आहे, ती लांब अंतरावर मारा करू शकते. बुलेटप्रूफ अंडरवेअर घालत नाही जेव्हा अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात गेले, तेव्हा त्यांची सामान्य तक्रार होती की शरीराच्या वरील भागाचे म्हणजे डोके आणि छातीचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट आणि चिलखत आहे. मात्र, खालच्या शरीराचे म्हणजे शरीराच्या खालच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी काहीही नाही. त्यानंतर पेंटागॉनने सैनिकांना बुलेटप्रूफ अंतर्वस्त्रे दिली. अमेरिकन मीडिया हसून म्हणते की चीनमध्ये सैनिक अजूनही ईलास्टिकटी अंडरवेअर घालतात.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Army, China, Indian army

  पुढील बातम्या