मराठी बातम्या /बातम्या /explainer /

China birth rate | चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

China birth rate | चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

China's birth rate fell Down: चीनसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व सरकारी योजनांनंतरही देशातील नैसर्गिक विकास दर 2020 मध्ये 1.45 प्रति हजार इतका खाली आला आहे, जो गेल्या 43 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा ट्रेंड असाच चालू राहिला आणि लोकसंख्या कमी झाली तर चीन जगातील सर्वात श्रीमंत देश होण्याआधी म्हातारा होऊ शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 22 नोव्हेंबर: सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील जन्मदर (China’s birth rate fell down) खूपच घसरला आहे. ग्लोबल टाइम्सने नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2020 मध्ये चीनमध्ये मुलांचा जन्मदर 1% पेक्षा कमी झाला आहे. हा 43 वर्षांतील सर्वात कमी आहे. ग्लोबल टाइम्सने चीनच्या सरकारी विभाग नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, 2020 मध्ये, जन्मदर प्रति हजार लोकांमागे 8.52 इतका नोंदवला गेला आहे, जो गेल्या 43 वर्षांतील सर्वात कमी आहे.

सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे चीन सरकार मुलांचा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करत असताना चीनमधील बालकांचा जन्मदर खूपच घसरला आहे. आता चीनमध्ये तीन मुले जन्माला घालण्याची (China’s Population) परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजनाही राबवल्या आहेत.

चीनसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व सरकारी योजनांनंतरही देशातील नैसर्गिक विकास दर 2020 मध्ये 1.45 प्रति हजार इतका खाली आला आहे, जी गेल्या 43 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा ट्रेंड असाच चालू राहिला आणि लोकसंख्या कमी झाली तर चीन जगातील सर्वात श्रीमंत देश होण्याआधीच म्हातारा होऊ शकतो. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021 च्या पहिल्या तीन तिमाहीत 58.8 लाख विवाह झाले. जे 2019 च्या तिमाहीपेक्षा 17.5% कमी आहे.

जन्मदर हा देशाच्या एकूण लोकसंख्येतील नवजात बालकांची संख्या आहे, तर वाढीचा दर जन्मलेल्या मुलांची संख्या आणि जन्मानंतर मुलांचा मृत्यू लक्षात घेऊन तयार केला जातो. चीन सरकारच्या NBS विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये चीनमध्ये जन्मदर प्रति 10.48 प्रति 1,000 होता.

धोक्याची घंटा ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट; चीनमध्ये Corona returns, अनेक ठिकाणी Lockdown

2020 मध्ये नवजात मुलांचे प्रमाण 15% कमी झाले

चीनमध्ये, 2020 साली नवजात अर्भकांचे प्रमाण 15 टक्क्याने कमी झाले. 2020 मध्ये येथे सुमारे 1.03 कोटी मुलांचा जन्म झाला. 2019 मध्ये ही संख्या 1.17 कोटी होती. या समस्येमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, कारण काम करणाऱ्या लोकांचे वय निवृत्तीच्या जवळ येत आहे. चीन तरुणांची सतत कमी होत चाललेली संख्या आणि झपाट्याने वृद्धत्वामुळे त्रस्त आहे.

या वर्षी मे महिन्यात चाइल्ड पॉलिसी बदलली

या वर्षी मे महिन्यात चीनने विवाहित जोडप्यांना जास्तीत जास्त 3 मुले जन्माला घालण्याची परवानगी देऊन जुने कुटुंब नियोजन धोरण काढून टाकण्याची घोषणा केली. देशात 4 वर्षांपासून नवजात बालकांच्या संख्येत झालेली घट पाहून हा नियम आणण्यात आला आहे. यापूर्वी 2016 मध्ये चीनने 1970 पासून येथे सुरू असलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमध्ये बदल केला होता.

India Vs China | एकेकाळी भारतापेक्षा गरीब असलेला चीन जगातील सर्वात श्रीमंत देश कसा झाला?

जन्मदर का कमी होत आहे?

बीजिंग-आधारित थिंक-टँक सेंटर फॉर चायना अँड ग्लोबलायझेशनचे डेमोग्राफर हुआंग वेनझेंग यांच्या मते, कमी जन्मदरामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मुलांना जन्म देणाऱ्या महिलांची संख्या कमी होणे, दुसरे कारण म्हणजे झपाट्याने होणारे शहरीकरण आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांची संख्या आणि तिसरे कारण म्हणजे लसीकरणासह कोविड-19 निर्बंध. सध्या चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. 2016 मध्ये सरकारने एक मुल धोरण रद्द केले असूनही, चीनची तरुण लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

First published:

Tags: Birth rate, China, Population