बीजिंग/ नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : भारत आणि चीन (India-China Standoff) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून तणाव कायम आहे. दरम्यान मंगळवारी भारतीय सैन्याने चीनची विनंती मान्य केली असून सीमेजवळ पकडलेल्या चिनी सैनिकाला सुखरूप मायदेशी पाठवले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) एक निवेदन प्रसिद्ध करून भारतीय सैन्याला चिनी सैनिकाला परत पाठवण्याची विनंती केली होती. चिनी सैन्याचे म्हणणे आहे की हा जवान चुकून एलएसी ओलांडून काही मेंढपाळांना मार्गदर्शन करण्याच्या प्रयत्नात भारतीय हद्दीत घुसले होते.
भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले की, सोमवारी पूर्व लद्दाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक जवान जेव्हा ते एलएसीवर भटकताना आढळला तेव्हा त्याला पकडले. ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार या सैनिकाला बुधवारी सकाळी सोडण्यात आले. चिनी सैन्याने या सकारात्मक वर्तनाबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत आणि अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत ते एक चांगले चिन्ह मानले आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे आणि चीन-भारत कमांडर स्तरावर आठपेक्षा जास्त वेळा बोलणी झाली आहे.
वाचा-चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येणार, अशी आहे योजना!चिनी सैन्यानं केली होती विनंतीभारतीय सैन्याने एक निवेदन जारी केले असून असे म्हटले आहे की, पकडलेल्या PLA सैनिकाची ओळख कॉर्पोरल वांग किंवा लाँग अशी आहे. औपचारिकता पूर्ण केल्यावर, त्यांना चुशुल-मोल्दो सीमा पॉइंट येथे चिनी सैन्याकडे सोपविण्यात आले. पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते ज्येष्ठ कर्नल झांग शुली यांनी असा दावा केला आहे की चीनी सैनिक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चीन-भारत सीमेवर बेपत्ता झाला होता. या घटनेनंतर लगेचच पीएलए सीमेवर तैनात सैन्याने भारतीय सैन्याला माहिती दिली आणि आशा व्यक्त केली की भारतीय लष्कर त्याच्या शोधात आणि बचावात मदत करेल. त्यानंतर भारतील हद्दीत हा जवान सापडल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
वाचा-आता Twitter वर जम्मू-काश्मीर दाखवलं चीनमध्ये; सोशल मीडियावर खळबळभारतीय लष्करानं दिले माणुसकीचे उदाहरणहा सैनिक पूर्व लडाखच्या डेमचॉक सेक्टरमध्ये हरवला होता. एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैन्याने अटकेनंतर माणुसकीचे उदाहरणे दिले आहे. या चिनी सैनिकाला येथील वातावरणापासून वाचवण्यासाठी ऑक्सिजन, अन्न आणि उबदार वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रोटोकॉलनुसार, निर्धारित कार्यपद्धतीचे पालन केल्यानंतर, या सैनिकाला चिनी सैन्याकडे सोपवण्यास सांगितले गेले.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.